मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतात आत्मघातकी हल्लाचा मोठा कट, रशियात पकडला IS चा सुसाईड बॉम्बर

भारतात आत्मघातकी हल्लाचा मोठा कट, रशियात पकडला IS चा सुसाईड बॉम्बर

भाजपचा वरिष्ठ नेता IS च्या निशाण्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्य आशियातला हा दहशतवादी, तुर्कीत असताना इसिसच्या संपर्कात आला.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : ऐन सणासुदीत देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतात आताच्या घडीला अनेक घटना घडत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपाताचा कट उधळला. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हरिहरेश्वर इथे संशयित बोट सापडली असून त्यामध्ये शस्त्र सापडली आहेत. आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ISIS च्या निशाण्यावर पुन्हा एकदा भारत असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतात सुसाईड अटॅक घडवून आणण्याचा ISIS चा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. रशियातून भारतात येणाऱ्या एकाचा अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. हा व्यक्ती संशयास्पदरित्या रशियामार्गे भारतात घुसणार होता. त्याच वेळी त्याला भारतात येताना अटक करण्यात आली.़

Pulwama : सुरक्षा दलाने मोठ्या घातपाताचा कट उधळला, 10 किलो स्फोटकं जप्त

भाजपचा वरिष्ठ नेता ISIS च्या निशाण्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्य आशियातला हा दहशतवादी, तुर्कीत असताना इसिसच्या संपर्कात आला. त्यांनी आत्मघातकी हल्ल्याचा कट रचला. हा कट उधळून लावण्यात यश आलं आहे. या प्रकरणी आता अधिक चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: BJP, Terror acttack