नवी दिल्ली, 17 एप्रिल: रेल्वे बोर्डाचे चेअरमन सुनित शर्मा (Railway Board Chairman Suneet Sharma) यांनी शुक्रवारी अशी माहित दिली आहे की, आतापर्यंत कोणत्याही राज्याला रेल्वे गाड्यांचे संचालन बंद करण्याचा सूचना देण्यात आल्या नाही आहेत. त्यांनी अशी माहिती दिली आहे राज्यांमध्ये ज्याठिकाणी कंटेनमेंट झोन (Containment Zones) बाबतीत काळजी व्यक्त केली जात आहे त्याठिकाणी तपासणी (Random Check) आणि गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर तपासणी केली जात आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शर्मा म्हणाले की, रेल्वेने अशी माहिती दिली आहे की सर्व राज्ये IRCTC तिकीट बुकिंग वेबसाइटवर दिलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहेत. वेबसाइट आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची किंवा कोव्हिड-19 निगेटिव्ह सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे, शिवाय ज्या भागात जायचे आहे त्याठिकाणी तपासणी प्रक्रियेमधून जावे लागेल. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, आतापर्यंत कोणत्याच राज्याला रेल्वे गाड्यांचे संचालन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या नाही आहेत. पण ज्याठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे, त्याठिकाणी राज्य सरकारांनी आमच्याशी या विषयावर चर्चा केली आहे आणि जेथे कंटेंटमेंट झोन आहेत तिथे रँडम चेक होत आहे. ई-तिकिटिंगच्या वेबसाइटवर रेल्वेने सर्व माहिती दिली असून प्रवाशांना असं सांगण्यात येत आहे की त्यांना गंतव्यस्थानावर आल्यावर तपासणी करावी लागेल किंवा कोव्हिड -19 चे प्रमाणपत्र घेऊन जावे लागेल. (हे वाचा- मोठी बातमी! देशात लवकरच सुरू होणार 8 नव्या बँका, RBI ने जारी केली नावांची यादी ) वाढले प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर शर्मा यांनी अशी देखील माहिती दिली आहे की रेल्वेकडून प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग देखील सुरू आहे. शिवाय कोव्हिड-19 प्रोटोकॉल अंतर्गत नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. त्यांनी सध्या श्रमिक स्पेशल ट्रेन्सचे संचालन करण्याबाबतची शक्यता नाकारली आहे आणि असं म्हटलं आहे की मागणी आणि आवश्यकतेनुसार ट्रेन्सचे संचालन केले जाईल. शर्मांनी अशी माहिती दिली की प्लॅटफॉर्म्सवर अनावश्यक गर्दी टाळण्याासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचा दरही वाढवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.