जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत? 'या' ठिकाणी तब्बल 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत? 'या' ठिकाणी तब्बल 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत? 'या' ठिकाणी तब्बल 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग

Coronavirus third wave in India?: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भारतात सुरूवात झाली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 22 मे: संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले असताना आता कुठे बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. मात्र, असे असतानाच आता पुन्हा सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील दौसा (Dausa Rajasthan) येथे कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus third wave) आल्याची चिन्हे दिसत आहेत. दौसा येथे तब्बल 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग (341 childs tests covid positive) झाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दौसा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. राजस्थानमधील दौसा येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात झाली असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. येथील 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ही सर्व 341 मुले 0 ते 18 या वयोगटातील आहेत. 1 मे 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत या मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांसाठी चांगली बातमी, 96 टक्के रुग्णांमध्ये वर्षभरानंतरही पुरेशा अँटिबॉडी दौसाचे जिल्हाधिकारी जिल्ह्यातील 341 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे मात्र, यापैकी कोणातही संसर्गाची गंभीर लक्षणे नाहीयेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दौसा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून रुग्णालयातही योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, राजस्थानच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजस्थान सरकारने आता युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाची टीम गावोगावी आणि घरोघरी भेट देऊन नागरिकांची कोविड टेस्ट करणार आहे. गावातच कोविड केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे आणि बाधितांवर योग्य ते उपचार सुरू केले जाणार आहेत. प्रत्येक घराघरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात