नवी दिल्ली, 15 जानेवारी : लग्न हे एक पवित्र बंधन आहे. या पवित्र बंधनात दोन लोक आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत जोडले जातात. त्यामुळे हा खास दिवस, खास क्षण आणखीनच स्पेशल बनवण्यासाठी लोक लग्नात अनेक निरनिराळ्या गोष्टी करताना पहायला मिळतात. नव्या आयुष्याची सुरुवात करताना भूतकाळातील घडलेल्या वाईट गोष्टी किंवा आलेले वाईट अनुभव लोक विसरतात. मात्र लग्नात अचानक आपला भूतकाळ आपल्यासमोर येऊन उभा राहिला तर? याचा कधी विचार केलाय का? असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडल्याचं समोर आलंय. चीनमध्ये एका लग्नात नवरीने चक्क तिच्या 5 एक्स बॉयफ्रेंडला बोलवल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण समारंभात त्यांना विशेष वागणूक देण्यात आली आणि जेवणासाठी खास टेबलही लावण्यात आले. त्यामुळे हे लग्न सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे. नेटकरीही यावर भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत. हेही वाचा - लग्न लेकाचं आणि हवा वडिलांची; जबरदस्त डान्सने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा Video साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हे लग्न हुबेई येते 8 जानेवारीला झाले होते. त्याचे फोटो चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Douyin) प्रकाशित करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये पाच मुलं डायनिंग टेबलवर बसलेली आहेत. असा दावा केला जात आहे की हे सर्व वधूचे एक्स बॉयफ्रेंड आहेत, ज्यांना लग्नासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते.
लग्नात टेबलावर त्या सर्वांच्या समोर नावाची पाटीही होती, ज्यावर ‘टेबल ऑफ एक्स-बॉयफ्रेंड’ असेही लिहिले होते. व्हायरल झालेले फोटो पाहून यूजर्सनी याचे वर्णन ‘द स्ट्रेंजेस्ट फूड’ असे केले आहे.
एका युजरने लिहिले, आपल्या एक्स बॉयफ्रेंडला लग्नात आमंत्रित करणे खूप धाडसाची गोष्ट आहे. यामुळे संबंधही बिघडू शकतात. आणखी एका युजरने लिहिले, वधूला काय सिद्ध करायचे होते? आणखी एक जण म्हणाला, मला खरंच आश्चर्य वाटत आहे. काहीजण या घटनेवर संतापही व्यक्त केला.