नवी दिल्ली 24 ऑगस्ट: काँग्रेस कार्य समितीची सोमवारी झालेली बैठक वादळी ठरली. कोरोनामुळे सगळेच नेते व्हिडीओ कॉन्फरन्सने त्यात जोडले होते. काँग्रेस नेत्यांनी सोनियांना पत्र लिहिल्याने राहुल गांधी काही ज्येष्ठ नेत्यांवर भडकले, त्यानंतर गुलाब नबी आझाद आणि कपील सिब्बल यांनी काही वक्तव्य केलीत. त्यामुळे मतभेदांची चर्चा सगळ्याच माध्यमांवर झाली होती. त्यामुळे बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत के.सी. वेणुगोपाल यांनी पक्षातल्या नेत्यांना तंबी देत न बोलण्याचा सल्ला दिला. वेणुगोपाल म्हणाले, काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. इथे प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र ते मत हे पक्षाच्या व्यासपीठावरच व्यक्त व्हायला पाहिजे. माध्यमांवरून ते मांडायला नको. अशा गोष्टींमुळे नको त्या गोष्टींची चर्चा होते आणि त्याचा परिणाम हा पक्षाच्या प्रतिमेवर होते.
The CWC notes that internal party issues cannot be deliberated through the media or public fora. CWC urges and advises all concerned to raise such issues only in party fora: KC Venugopal, Congress Working Committee pic.twitter.com/qriIBuV13Q
— ANI (@ANI) August 24, 2020
काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीच्या (CWC)अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादावादीबद्दल पहिल्यांदाच अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दुखावले गेले आहे, असं सांगत त्यांनी हे सगळेच आपले कार्यकर्ते असल्याचं सांगितलं. ‘राजकारणातून गांधी-नेहरू परिवाराचं अस्तित्व संपलं’ काँग्रेसवर भाजपची टीका काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष राहतील. लवरात लवकर कार्यकारिणीची बैठक घेऊन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सोनियांनी दिले असल्याचं समजतं. पुढच्या 6 महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळवण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असं काँग्रेस नेते आणि कार्यकारिणीचे सदस्य के. एच. मुनियप्पा यांनी सांगितलं. काँग्रेसच्या राजकीय नाट्यात अहमद पटेलांची एण्ट्र, राहुल गांधींसाठी मोर्चेबांधणी सध्याचा काळ लक्षात घ्यायला हवा. Covid-19 च्या साथीचं संकट आहे. अशा वेळी आता सगळं विसरून एकत्र कामाला लागायला हवं. मी दुखावले गेले आहे, हे खरं आहे. पण ते माझेच सहकारी आहेत. कार्यकर्ते आहेत. झालं गेलं विसरून जाऊन आपण एकत्र काम करण्याची गरज आहे, असं सोनिया गांधी यांनी सांगितल्याचं ANI चं वृत्त आहे.

)







