मराठी बातम्या /बातम्या /देश /पोलीस गणवेशात आई-वडिलांसमोर उभी राहिली मुलगी! Video पाहून डोळ्यात येईल पाणी

पोलीस गणवेशात आई-वडिलांसमोर उभी राहिली मुलगी! Video पाहून डोळ्यात येईल पाणी

पोलीस अधिकारी झालेली मुलगी तिच्या शेतकरी आई-वडिलांना भेटण्यासाठी थेट शेतामध्ये गेली होती. तेव्हा तिच्या आई-वडिलांना झालेला आनंद पाहून तुमच्याही डोळ्यांतून आनंदअश्रू येतील.

पोलीस अधिकारी झालेली मुलगी तिच्या शेतकरी आई-वडिलांना भेटण्यासाठी थेट शेतामध्ये गेली होती. तेव्हा तिच्या आई-वडिलांना झालेला आनंद पाहून तुमच्याही डोळ्यांतून आनंदअश्रू येतील.

पोलीस अधिकारी झालेली मुलगी तिच्या शेतकरी आई-वडिलांना भेटण्यासाठी थेट शेतामध्ये गेली होती. तेव्हा तिच्या आई-वडिलांना झालेला आनंद पाहून तुमच्याही डोळ्यांतून आनंदअश्रू येतील.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 6 फेब्रुवारी :  मुलांचं यश हे आई-वडिलांसाठी खूप आनंद देणारं असतं. मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जेव्हा नोकरी लागते, तेव्हा तर आई-वडिलांच्या आनंदाला सीमाच राहत नाही. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे. एक पोलीस अधिकारी झालेली मुलगी तिच्या शेतकरी आई-वडिलांना भेटण्यासाठी थेट शेतामध्ये गेली होती. तेव्हा तिच्या आई-वडिलांना झालेला आनंद पाहून तुमच्याही डोळ्यांतून आनंदअश्रू येतील. ‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलंय.

  मुलांच्या यशामुळे प्रत्येक पालकाचा उर अभिमानानं भरून येतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. यामध्ये सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर एक मुलगी तिच्या आई-वडिलांसमोर पहिल्यांदा गणवेशात जाते. पोलिसांच्या गणवेशात मुलीला पाहून पालकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. आई मुलीला मिठी मारते, तर वडील तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात असं या व्हिडिओत दिसतंय. युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

  अतिथी देवो भव! परदेशी महिला पर्यटकानं मानले टॅक्सी चालकाचे आभार, कारणही आहे खास

  हा व्हिडिओ मोनिका पुनिया यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलाय. व्हिडिओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. मोनिका यांच्या इन्स्टाग्राम बायोनुसार, त्यांनी 20 हून अधिक सरकारी परीक्षा पास केल्या आहेत. त्या त्यांच्या युट्यूब चॅनेलवर स्पर्धा परीक्षांशी संबंधित माहिती आणि टिप्स शेअर करतात. या चॅनेलला त्यांचे 60 हजारांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. ऑगस्ट 2022 मध्येच त्यांनी हे चॅनल सुरू केलंय. आता नुकताच त्यांनी या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केलाय.

  प्रभू रामांच्या मूर्तीसाठी देशातील प्रसिद्ध चित्रकार करणार रेखाटन, जाणून घ्या कसे असेल स्वरुप

  व्हिडिओमध्ये नेमकं काय?

  मोनिका दिल्ली पोलिसात कार्यरत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, जेव्हा त्या सब इन्स्पेक्टरच्या गणवेशात पालकांना पहिल्यांदा भेटतात, तेव्हा त्यांच्या पालकांची प्रतिक्रिया कशी होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मोनिका त्यांच्या आईसमोर गेल्यावर आईनं त्यांना मिठी मारली. 'स्टार लागले माझ्या मुलीला’ असं त्या म्हणाल्या. यानंतर मोनिका या वडिलांसमोर जातात. त्यांचे वडील शेतातून येत असतात. मुलीला पोलीस गणवेशात पाहून त्यांनाही आनंद होतो.

  " isDesktop="true" id="826161" >

  ‘मला माझ्या मुलीला पाहून खूप अभिमान वाटतो.’ तसंच मुलींना सक्षम आणि स्वावलंबी बनवा, असा संदेश देताना त्यांनी सांगितलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अनेकांनी व्हिडिओला कमेंट देत मोनिका पुनिया यांचे अभिनंदनही केले आहे.

  First published:

  Tags: Delhi Police, Social media, Video viral