मराठी बातम्या /बातम्या /देश /प्रभू रामांच्या मूर्तीसाठी देशातील प्रसिद्ध चित्रकार करणार रेखाटन, जाणून घ्या कसे असेल स्वरुप

प्रभू रामांच्या मूर्तीसाठी देशातील प्रसिद्ध चित्रकार करणार रेखाटन, जाणून घ्या कसे असेल स्वरुप

अयोध्या

अयोध्या

अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर बांधलं जात आहे. मंदिराचं बांधकाम वेगाने सुरू आहे. मंदिराच्या बांधकामात राजस्थानच्या बन्सी पहाडपूर येथील दगडांचा वापर केला जात आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  अयोध्या, 6 फेब्रुवारी : अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर बांधलं जात आहे. मंदिराचं बांधकाम वेगाने सुरू आहे. मंदिराच्या बांधकामात राजस्थानच्या बन्सी पहाडपूर येथील दगडांचा वापर केला जात आहे. मंदिराच्या गर्भगृहाचं बांधकाम डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल आणि जानेवारीमध्ये भक्तांना प्रभू श्री रामांचं दर्शन घेता येतील.

  प्रभू रामांच्या मंदिराच्या उभारणीत बालरामाची मूर्ती बसवली जाणार आहे, असं म्हटलं जातंय. ती मूर्ती सुमारे 5 फूट उंच असेल. रामललाच्या मूर्तीची तयारी सुरू झाली आहे. देशातील ज्येष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ कामत हे शाळिग्राम शिळेवर रामललाचं चित्र रेखाटणार आहेत व त्यानंतर रामललाची मूर्ती साकारली जाईल. या पूर्वी झालेल्या मंदिर बांधकाम समितीच्या बैठकीत अनेक शिल्पकार आणि चित्रकारांनी रामाच्या मूर्तीची वेगवेगळी चित्रं सादर केली होती. त्यांचं स्वरूप पाहिल्यानंतर शिळेवर चित्र रेखाटण्याची जबाबदारी देशातील प्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ कामत यांना सोपवली आहे, असं समोर आलंय.

  हेही वाचा -  लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीसोबत घडली धक्कादायक घटना, अंघोळीला गेली अन्...

  मूर्तीचं स्वरुप कसं असेल?

  ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ कामत वेगवेगळ्या चित्रांचा समावेश करून रामललाच्या मूर्तीचं अंतिम स्वरूप तयार करणार आहेत. जेव्हा प्रभू राम त्यांच्या गर्भगृहात विराजमान होतील, तेव्हा भक्तांना 35 फूट अंतरावरून त्यांचं दर्शन आणि पूजा करता येईल. यासाठी वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सध्या शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत.

  दरम्यान, रामललांच्या मूर्तीच्या स्वरूपाबदद्लही चंपत राय यांनी माहिती दिली. अनेकांनी प्रभू रामाचे फोटो बनवून पाठवले आहेत. सर्वांचा कॉम्प्युटरवर तुलनात्मक अभ्यास केला आहे. कोणते डोळे चांगले आहेत, ज्यात कोमलता आहे, दैवी भावना आहे, केस चांगले आहेत, कोणत्या फोटोत त्यांच्या ओठांचे हास्य चांगले आहे, नाभीच्या वरील भागाचा आणि नाभीच्या खालील भागाचा एक तुलनात्मक अभ्यास केला जात आहे. मूर्तीचा आकार काय आहे? रामाच्या मूर्तीच्या पायांत खडावा असाव्यात की नको? धनुष्य खांद्यावर असावं की नसावं. यावर लोकांनी आपापली मतं मांडली होती. चित्रकार विश्वनाथ कामत यांनी सर्वांची मतं ऐकून घेतली. त्यांनी काही चित्रेही आणली होती. आता प्रत्येकाच्या कल्पना त्यांनी चित्रात समाविष्ट कराव्यात अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, असं चंपत राय यांनी सांगितलं.

  प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या उभारणीचे काम वेगात सुरू आहे. रामांच्या मूर्तीसाठी नेपाळमधून शाळिग्राम शिळा आणण्यात आली आहे. त्या शिळेपासून मूर्ती घडवण्यात येणार आहे.

  First published:

  Tags: Ayodhya, Ayodhya ram mandir, Local18