मराठी बातम्या /बातम्या /देश /

जनतेला बसत आहेत महागाईचे चटके; गेल्या 10 वर्षांत डाळ, तांदूळ, खाद्यतेलाच्या किंमतीत `अशी` झाली वाढ

जनतेला बसत आहेत महागाईचे चटके; गेल्या 10 वर्षांत डाळ, तांदूळ, खाद्यतेलाच्या किंमतीत `अशी` झाली वाढ

Inflation in India:  सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Inflation in India: सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Inflation in India: सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली, 10 मे: गेल्या काही महिन्यांपासून इंधन, घरगुती आणि व्यावसायिक वापराचा सिलिंडर, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमती वेगानं वाढत आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचा (Inflation) चटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना नोकरी, रोजगार गमवावा लागला. या गोष्टीचा साहजिकच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढती महागाई अशा विषम स्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते मेटाकुटीला आले आहेत. `आज तक`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. महागाई कशी आणि किती प्रमाणात वाढतेय हे पाहायचं झाल्यास दैनंदिन वापरातल्या गव्हाच्या पीठाचे (Wheat flour) दर हे उत्तम उदाहरण ठरु शकेल. चपाती (Chapati) हा आपल्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा पदार्थ होय. एक माणूस एकावेळी किमान चार चपात्या खातो. हिशेब करायचा झाला तर चार चपात्यांसाठी 100 ग्रॅम पीठ लागतं. 10 वर्षांपूर्वी एक किलो गव्हाचं पीठ 22 रुपये 48 पैसे होतं. चार चपात्यांकरिता पिठासाठी 2 रुपये 24 पैसे खर्च येत होता. आता गव्हाच्या एक किलो पिठाचा दर 32 रुपये 91 पैसे प्रतिकिलो झाला आहे. हिच स्थिती खाद्यतेल (Oil), तांदूळ (Rice) आदी गोष्टींची आहे. 9 मे रोजी देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत 32 रुपये 91 पैसे होती. केवळ एका वर्षात एक किलो पिठाच्या दरात चार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, अशी माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Consumer Affairs) दिली. अजबच आहे! चोराने आधी मालकाच्या घरासमोरील गवत कापलं, मगच पळवून नेलं मशीन  गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे दर वाढल्याने साहजिकच बेकरी उत्पादनांच्या (Bakery products) किमतीदेखील वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत बिस्किटं, ब्रेड (Bread) आदींच्या किमतींत वाढ झाली आहे. ब्रेडची किरकोळ दरवाढ या वर्षी मार्चमध्ये 8.39 टक्के होती. ही वाढ 7 वर्षातली उच्चांकी आहे. जॅम बिस्किट, मेरी गोल्ड सारखे बेकरी पदार्थ उत्पादित करणारी ब्रिटानिया कंपनी (Britannia) आगामी काळात आपल्या उत्पादनाच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहे. जगभरातल्या राजकीय गोंधळामुळे मैदा, साखर, काजू, गव्हाचं पीठ या पदार्थांचे दर वाढत आहेत, अशी माहिती ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी नुकतीच दिली आहे. गव्हाच्या पिठाचे दर वाढण्यामागे दोन कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकीकडे देशात गव्हाचं उत्पादन घटत असून, गव्हाचा साठादेखील कमी होत आहे. दुसरीकडे अन्य देशांकडून भारतीय गव्हाला मागणी वाढत आहे. शासकीय आकडेवारीनुसार, 9 मे रोजी राजधानी दिल्लीत एक किलो पिठाचा दर 27 रुपये, अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये 59 रुपये तर मुंबईत 49 रुपये होता. 1 जानेवारीपासून आतापर्यंत पिठाचे दर 6 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे (Russia - Ukraine War) गव्हाचं (Wheat) उत्पादन घटलं आहे. जागतिक गहू निर्यातीत रशिया आणि युक्रेनचा वाटा एक चतुर्थांश आहे. 2019 मध्ये रशियाने 8.14 अब्ज डॉलर तर युक्रेनने 3.11 अब्ज डॉलरचा गहू निर्यात केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु असल्याने जगभरात गव्हाचा तुटवडा जाणवत असून, त्याचे दर वाढत आहेत. भारतीय गव्हाला अन्य देशांकडून मागणी वाढलेली आहे. त्यामुळे देशात गव्हाचे दर वाढले आहेत. त्याशिवाय डिझेलचे दर वाढल्याने गव्हाच्या वाहतुकीचे दर वाढले आहेत. केवळ गव्हाचं पीठ नाही तर डाळी, तांदूळ, खाद्य तेल आणि मीठाच्या (Salt) किमतीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. 10 वर्षांत एक किलो तांदळाची किंमत 42 टक्क्यांनी वाढली आहे. 9 मे 2013 रोजी एक किलो तांदळाची सरासरी किंमत 25 रुपये 40 पैसे होती. मात्र 9 मे 2022 ला हिच किंमत वाढून 36 रुपये 70 पैसे झाली आहे. त्याचप्रमाणे तूर डाळीचे दर 48 टक्क्यांनी वाढून किलोला 70 रुपयांवरून 102 रुपयांवर पोहोचले आहे. उडीद डाळीचे दर 57 रुपये 62 पैशांवरून 105 रुपये 2 पैशांवर पोहोचले आहेत. 9 मे 2013 रोजी मूग डाळ 73 रुपये 68 पैसे होती. हेच दर 9 मे 2022 रोजी 103 रुपयांवर पोहोचले आहेत. मसूर डाळीचे दर 54 रुपये 82 पैशांवरून 96 रुपये 77 पैसे प्रतिकिलो झाले आहेत. Watch Video: मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेचा दुसरा जबरदस्त टीझर जारी खाद्य तेलाच्या किमती देखील वेगानं वाढत आहेत. 10 वर्षांत शेंगदाणा तेलाचे दर 43 टक्क्यांपर्यंत तर मोहरीच्या तेलाचे दर 84 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. पामतेल (Palm Oil) गेल्या दहा वर्षांत 140 टक्क्यांनी महागलं आहे. दुसरीकडे वनस्पती तेल गेल्या दहा वर्षांत 129 टक्क्यांनी महागलं आहे. 9 मे 2013 रोजी शेंगदाणे तेलाचे दर 131 रुपये 11 पैसे होते. हेच दर 9 मे 2022 रोजी 187 रुपये 11 पैशांवर पोहोचले आहेत. मोहरीचं तेल 100 रुपये 88 पैशांवरून 185 रुपये 52 पैसे, सोयाबीन तेल 85 रुपये 78 पैशांवरून 170 रुपये 33 पैसे, सूर्यफूल तेल 98 रुपये 38 पैशांवरून 192 रुपये 34 पैसे तर पाम तेल 66 रुपये 38 पैशांवरून 159 रुपये 51 पैशांवर पोहोचलं आहे. मिठाचे दरही गेल्या काही वर्षात वाढल्याचं दिसून येतं.
First published:

Tags: India, Inflation

पुढील बातम्या