जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजबच आहे! चोराने आधी मालकाच्या घरासमोरील गवत कापलं, मगच पळवून नेलं मशीन

अजबच आहे! चोराने आधी मालकाच्या घरासमोरील गवत कापलं, मगच पळवून नेलं मशीन

अजबच आहे! चोराने आधी मालकाच्या घरासमोरील गवत कापलं, मगच पळवून नेलं मशीन

पोलिसांनीच सोशल मीडियावर हा सर्व प्रकार सांगितला.

  • -MIN READ
  • Last Updated :

Ajab Gajab News: आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटनांबद्दल ऐकलं असेल. पण आज तुम्हाला अशा घटनेबद्दल सांगणार आहोत. ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. अमेरिकेतील टेक्सास राज्यातून ही घटना समोर आली आहे. येथे एका चोरट्याने घरातून गवत कापण्याचे मशीन चोरले. चोरीच्या या घटनेतील सर्वात मनोरंजक बाब म्हणजे मशीन चोरण्यापूर्वी चोरट्याने घरमालकाच्या हिरवळीची साफसफाई केली होती. आधी गवत कापलं मग पळवली मशीन… ANI ने दिलेल्या बातमीनुसार, टेक्सासमधील एका गावातील मार्कस हबार्ड (Marcus Hubbard) नावाच्या चोराने घरातून गवत कापण्याचं मशीन पळवलं. या घटनेनंतर पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी करीत सांगितलं की, चोराने आधी मालकाच्या लॉनमधील वाढलेलं गवत कापलं. यानंतर कटिंग मशीन घेऊन पळून गेला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर कटिंग मशीनने गवत कापताना दिसत आहे. हे ही वाचा- पाठवणीवेळी नवरी नाही, तर नवरदेवच ढसाढसा रडू लागला; VIDEO पाहून समजेल कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराने आधी घरासमोर आणि घरा मागे वाढणारे गवत कापले आणि नंतर कटिंग मशीन ओढून नेली. कदाचित असे करून तो कटिंग मशीन नीट चालते की नाही हे तपासत असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिन नीट काम करत असल्याचं समाधान झाल्यावर तो सोबत घेऊन गेला असावा. नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया… पोलिसांनी या घटनेबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे. यानंतर नेटकरी यावर कमेंट करीत आहे. एका युजरने लिहिलं आहे की, जर कोणी त्या चोराला ओळखत असेल तर त्याला माझ्या घरी पाठवा प्लीज. त्या मी माझं लॉनमोअर देईन. फक्त त्याने माझ्या घरासमोरील गवत कापून द्यावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात