Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा दुसरा जबरदस्त टीझर जारी, शिवसेनेची जोरदार तयारी; Watch Video

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा दुसरा जबरदस्त टीझर जारी, शिवसेनेची जोरदार तयारी; Watch Video

येत्या 14 मे रोजी बीकेसीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे.

    मुंबई, 10 मे: येत्या 14 मे रोजी बीकेसीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचा दुसरा टीझर (Teaser) शिवसेनेकडून (Shiv Sena) ट्विट (Tweet) करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं या बैठकीचा पहिला टीझर जारी केला होता. आज शेअर केलेल्या टीझरमध्येही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचा अंश वापरण्यात आला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही दिसत आहे. शिवसेनेनं (Shiv Sena) हा टीझर सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. पहिल्या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश वापरण्यात आला आहे. तसंच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी मास्क न लावता भाषण केले आणि 14 तारखेच्या सभेत मनात बरचं साचलंय ते बोलणार आहे, असा विरोधकांना इशाराही दिला. मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टयांमध्ये आणि निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी !’ या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मास्क काढून जोरदार भाषण केलं. 'आता आपण माणसात आलोय असं वाटतंय कारण बऱ्याच दिवसांनी माईकसमोर बोलायला लागलो आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे, तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढायचा आहे. आताचा कार्यक्रम हा महापालिकेचा आहे. सर्वांसाठी पाणी देण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्या राजकारण आणून पाणी गढूळ करणार नाही. प्रत्येकाला याचे भान असले पाहिजे, कुठे काय बोलायचे याचे ज्ञान असले पाहिजे' असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. 'हल्ली विचारांचे प्रदुषण होतंय कोणीही काहीही बोलत आहेत. विकृत विचार मांडले जात आहे. राजकारण जरूर करा पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही, सरकारने चागले काम केले तर सांगणे ही दिलदारी आहे पण आता ती दिसत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणतात की... '14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुबलेलं नाहीय पण मनात अनेक काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हल्ली थापा मारण्याची फार सवय आहे. अच्छे दिन येतील असं म्हटले होते, पण आता वाट बघतोय, अशा थापा चालणार नाहीत. कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत बाकी थापा मारणारे जास्त आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या