इंदूर, 7 मे : शुक्रवारी रात्री इंदूरमध्ये स्वर्णबाग येथे तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 7 जणांनी जीव गमावला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा तर्क सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. ही आग लागली नसून ती लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे स्वर्णबाग आगीच्या घटनेत नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दीक्षित नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचा खुलासा झाला आहे. या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्यानंतर त्याने रागाने इमारतीखाली उभी असलेली तिची गाडी पेटवून दिली होती. मात्र, ही आग पसरत जाऊन संपूर्ण इमारतच आगीच्या तडाख्यात सापडली आणि 7 जणांचा यात मृत्यू झाला. या आगीत जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी तरुण अद्याप फरार आहे. इंदूरच्या पोलीस आयुक्तांनी याबाबत ‘आज तक’ला माहिती दिली आहे. वास्तविक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे वृत्त आधी आले होते. मात्र पोलिसांनी या आगीच्या घटनेचा वेगळाच खुलासा केला आहे. तीन मजली इमारतीला आग इंदूरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तीन मजली इमारतीला आग लागली. सुरुवातीला हा शॉर्टसर्किटचा प्रकार असावा असा अंदाज होता. आग इतकी भीषण होती की 7 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला तर 8 जण गंभीररीत्या भाजले. सर्व जखमींना एमवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अचानक इमारतीतून धूर निघताना दिसला रात्री उशिरा इमारतीतून अचानक धूर निघताना प्रत्यक्षदर्शींना दिसला. लोकांना काही समजेपर्यंत आगीने भीषण रूप धारण केलं. आगीची माहिती स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दुसरीकडे आगीची माहिती मिळताच आजूबाजूच्या घरातून आणि इमारतींमधून लोक बाहेर आले आणि रस्त्यावर आले. हे वाचा - गलवानमध्ये जवान झाला शहीद, दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न पत्नीनं असं केलं पूर्ण 5 जण मृतावस्थेत आढळले मृतांपैकी बहुतांश भाडेकरू होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन दल आणि पोलीस इमारतीच्या आत गेल्यावर तेथे 5 जण मृतावस्थेत आढळले होते. तर, पाच जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी दोघांचा नंतर मृत्यू झाला. हे वाचा - ‘सभेत काय बोलू?’ राहुल गांधींचा शेतकरी सभेपूर्वीचा VIDEO VIRAL मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरमधील घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. शिवराज यांनी निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.