दिल्ली, 7 मे: भारतातील राष्ट्रीय पक्षांपैकी एक मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांचं नाव नेहमी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने चर्चेत असतं. ते पूर्णवेळ राजकारणी नसल्याची टीकाही विरोधक करत असतात. काल (6 मे 22) तेलंगणामध्ये (Telangana) एका शेतकऱ्यांच्या जाहीर सभेपूर्वी राहुल गांधींनी तेलंगणातील राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांना मी सभेत काय मुद्दे बोलू अशी विचारणा केली आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असून, भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर खरमरीत टीकाही सुरू केली आहे. तेलंगणातील वारंगळ इथं राहुल यांची जाहीर सभा होती. तत्पूर्वी स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ते एका कक्षात बसले होते. त्यांनी नेत्यांना विचारलं, ‘ हां, सांगा राज्यात सध्या काय चालू आहे? कुठला मुद्दा मी भाषणात मांडायचा आहे? या सभेची थीम काय आहे?’ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. त्यानंतर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी तो व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. ‘काल राहुल गांधी तेलंगणात त्यांच्याच तथाकथित शेतकरी एकता साधण्यासाठी आयोजित सभेपूर्वी विचारत आहेत थीम काय आहे? काय बोलायचंय? असं तेव्हा होतं जेव्हा तुम्ही खासगी परदेश दौरे आणि नाईटक्लबिंग (Night clubbing) करताकरता मध्येमध्ये राजकारण करता,’ अशी पोस्ट मालवीय यांनी केली आहे. ही पोस्टही व्हायरल होत आहे.
Yesterday, Rahul Gandhi before his rally in Telangana, supposedly in solidarity with farmers, asks what is the theme, क्या बोलना है! 🤦♂️
— Amit Malviya (@amitmalviya) May 7, 2022
This is what happens when you do politics in between personal foreign trips and nightclubbing…
Such exaggerated sense of entitlement. pic.twitter.com/NdRBDlGNK3
या व्हिडिओवर देशभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. टीआरएसशी युतीला नकार दरम्यान, काल झालेल्या सभेत राहुल यांनी तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) यांच्यावर सडकून टीका केली. ते मुख्यमंत्री नाहीत तर ते राजासारखे वागतात आणि तशीच त्यांची कामाची पद्धत आहे असं राहुल म्हणाले. शेतकऱ्यांच्या ‘रायथू संघर्ष सभा’ या जाहीर सभेत बोलताना राहुल म्हणाले, ‘ आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणात काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं दोन लाखांच कर्ज माफ करू. शेतकऱ्यांना योग्य एमएसपी मिळेल. केसीआर यांच्या सरकारच्या काळात राज्याच्या तसंच शेतकऱ्याच्या प्रगतीचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. पण आंध्र प्रदेशातून (Andhra Pradesh) तेलंगणा वेगळं राज्य झाल्यानंतर केवळ एका कुटुंबाचा प्रचंड फायदा झाला आहे.’
मुंबई: मशिदीत लाऊडस्पीकरच्या आदेशाचं पालन न करणं भोवलं, पोलिसांनी उचललं मोठं पाऊलपुढच्या वर्षी तेलंगणात विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल याबद्दल राहुल म्हणाले, ‘ समृद्ध तेलंगणाचं स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या व्यक्तीशी म्हणजेच मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांच्याशी काँग्रेस निवडणुकीवेळी कुठलीही युती करणार नाही. आपला राजकीय तोटा होणार आहे हे काँग्रेसला माहीत होतं तरीही 2014 मध्ये तेलंगणातील नागरिकांच्या वेगळ्या राज्याच्या मागणीच्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा राहिला. सामान्य तेलंगणवासीयां वाटलं होतं की राज्यात गरिबांचं हित साधणारं सरकार येईल पण त्यांचा भ्रमनिरास झाला.’ राहुल यांचा हा नवा व्हायरल व्हिडिओ देशभर, जगभर फिरत आहे. लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.