कुटुंबावर दु:खाचा डोंगर! एकत्र अ‍ॅडमिट झाले पती, पत्नी आणि मुलगा; पण घरी परतली फक्त आई

कुटुंबावर दु:खाचा डोंगर! एकत्र अ‍ॅडमिट झाले पती, पत्नी आणि मुलगा; पण घरी परतली फक्त आई

मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आली पतीच्या मृत्यूच्या बातमी, 24 तासांत विखुरलं अख्ख कुटुंब.

  • Share this:

इंदूर, 21 मे : कोरोनाची प्रकरणं दिवसेंदिवस देशात वाढत आहेत. मृत्यूदर कमी असला तरी, वाढती संख्या भीतीदायक आहे. यातच इंदूरमध्ये एक कुटुंब अवघ्या 15 दिवसांत विखुरलं. इंदूरमध्ये राहणारे संपूर्ण मनवानी कुटुंब सर्दी, खोकला आणि तापामुळं हैराण झाले होते. पती, पत्नी आणि मुलगा यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाची लक्षणं असल्यामुळं त्यांची टेस्ट करण्यात आली. मात्र तिघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले.

कोव्हिड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही रविवारी रात्री मुलगा विनोद याचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि कुटुंबीय दोघंही हैराण होते. कुटुंबियांनी तशाच दु:खात मुलावर अंत्यसंस्कार केले. मुलाच्या जाण्याचं दु:ख पचवण्याआधीच कुटुंबावर आणखी एक डोंगर कोसळला. सोमवारी रमेशलाल मनवानी यांचा मृत्यू झाला. तर त्याच दिवशी पत्नी अनिता निरोगी होऊन घरी परतल्या. मात्र अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाही.

वाचा-फक्त 'या' कारणामुळे नोव्हेंबरपर्यंत भारत होणार कोरोनामुक्त, शास्त्रज्ञांचा अंदाज

अशी बिघडली तब्येत

दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी हसत-खेळत असलेल्या कुटुंबाचे काय झाले हे कोणालाही समजू शकले नाही. कोणाच्या लक्षात आले? कुटुंबातील तिघेजणी रुग्णालयात जाता एकमेकांशी बोलत होते. प्रत्येकजण एकमेकांना प्रोत्साहित करत होता की, 'आधी तू ठीक होशील, प्रथम तू ठीक होशील,' पण ब्लड प्रेशर आणि शुगरच्या रूग्ण व मुलाची प्रकृती काळानुसार अधिकच खालावली.

वाचा-माणुसकीला सलाम! मुंबईत महिला पोलिसाने एकाच दिवशी केले 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार

न्यूमोनियावर सुरू होते उपचार

न्यूमोनियाच्या लक्षणांच्या आधारे दोघांवर उपचार केले जात होते. मुलगा विनोद यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबातील काही सदस्य आले. यानंतर रमेशलालच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांच्या पायाखालची जमिन सरकरली. विनोदच्या अंत्यसंस्काराचे दु:ख पचवण्याआधीच विनोदच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांना जावं लागलं.

वाचा-Lockdown चा फायदा, काही तासांसाठी उघडलं सलून अन् लखपती झाली हेअर स्टायलिस्ट

First published: May 21, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या