मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Vaccine च्या दोन डोसनंतरही 87 हजार जणांना इन्फेक्शन, Delta ची दहशत

Corona Vaccine च्या दोन डोसनंतरही 87 हजार जणांना इन्फेक्शन, Delta ची दहशत

देशात कोरोना प्रतिबंधक लसी (anti covid vaccine) टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण (Corona infection) होत असल्याचं दिसून आलं आहे.

देशात कोरोना प्रतिबंधक लसी (anti covid vaccine) टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण (Corona infection) होत असल्याचं दिसून आलं आहे.

देशात कोरोना प्रतिबंधक लसी (anti covid vaccine) टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण (Corona infection) होत असल्याचं दिसून आलं आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : देशात कोरोना प्रतिबंधक लसी (anti covid vaccine) टोचून घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण (Corona infection) होत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी (Protection) कोरोनाची लस हा एकमेव उपाय असल्याचं सांगितलं जात असलं, तरी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. विशेषतः जगभरात अनेकांना लसीकरणानंतर डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) लागण होत असल्याचं दिसून आलं आहे.

लसीकरणानंतरही संसर्ग

देशातील आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या डोस घेतलेल्या 1 लाख 71 हजार 511 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 87 हजार 49 जणांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

सर्व लसींबाबत सारखाच अनुभव

देशातील बहुतांश नागरिकांनी कोव्हिशिल्ड लस घेतली आहे. त्याखालोखाल कोव्हॅक्सिन आणि सर्वात कमी संख्या स्पुटनिक-व्ही ही लस घेतलेल्या नागरिकांची आहे. मात्र या तिन्ही लसी घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच लसीकरण झाल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण हे 0.084 असल्याचं समोर आलं आहे.

जगात डेल्टा व्हेरियंटची दहशत

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना नव्याने कोरोनाची बाधा होत असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये डेल्टा व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये लसीकरण झालेल्यांचंही लक्षणीय प्रमाण असल्याचं दिसून आलं आहे. मात्र लसीकरण झालेल्या रुग्णांना ते न झालेल्यांच्या तुलनेत कमी त्रास होत असल्याचंही दिसून आलं आहे.

हे वाचा -मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ...तोपर्यंत हटणार नाहीत मुंबईतले कोरोना निर्बंध!

लस घेण्याचं आवाहन

लसीकरण झाल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण होणार नाही, अशी खात्री कुणीच देत नसून लागण झाली तरी त्याविरुद्ध लढण्यासाठीची रोगप्रतिकारशक्ती शरीरात निर्माण करणं, हा लस घेण्यामागचा मुख्य हेतू असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे. लसीकरण झाल्यानंतर जर कोरोनाची लागण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होत नाहीत आणि कमी प्रयत्नांत शरीर या विषाणूचा सामना करू शकतं, असं सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus