मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /'Mixing vaccine नको कारण...', Cyrus Poonawalla यांनी सांगितला कॉकटेल लशीचा सर्वात मोठा धोका

'Mixing vaccine नको कारण...', Cyrus Poonawalla यांनी सांगितला कॉकटेल लशीचा सर्वात मोठा धोका

कोरोना लसीकरणात पुन्हा बदल. (Image credit/pexels-nataliya-vaitkevich)

कोरोना लसीकरणात पुन्हा बदल. (Image credit/pexels-nataliya-vaitkevich)

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांनी मिक्सिंग लशीला (Mixing vaccine) विरोध केला आहे

पुणे, 13 ऑगस्ट : काही देशांमध्ये मिक्स-अँड-मॅच कोरोना लशीचा (Mix and match vaccine) सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर भारतातही कॉकटेल कोरोना लशीचा (Cocktail vaccine) प्रयोग कऱण्यात आला. एकाच व्यक्तीने दोन्ही लशींचे डोस घेणं सुरक्षित (Safe) आहे, तसंच शरीरात चांगली प्रतिकारशक्ती (Immnunity) तयार करण्यासाठीही उपयुक्त आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने (ICMR) संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे. पण पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांनी मात्र कॉकटेल लशीला विरोध केला आहे.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीच्या मिक्सिंगला त्यांनी विरोध करत कॉकटेल कोरोना लस देऊ नका, असं म्हटलं आहे. दोन वेगवेगळ्या लशी देण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - Corona Vaccine: ...तर 'ही' लसच ठरतीये जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

पूनावाला यांनी सांगितलं, जर असं करताना काही चुकीचं झालं तर दोन लस उत्पादकांची ही खेळी असल्याचा आरोप केला होईल. काही दुष्परिणाम झाले तर सीरम दुसऱ्या कंपनीला त्यांची लस चांगली नाही, असा आरोप करेल. तर दुसरी कंपनी आमच्या लशीत समस्या असल्याचं म्हणले. कोरोना लशी मिक्स करणं चुकीचं आहे.

मी लस विकून पैसे बनवायला बसलो नाही मात्र लोकांनी लस घ्यावी कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पुनावाला यांनी म्हटलं आहे. आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किंमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला म्हणालेत.

हे वाचा - ''कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस'', सिरमचे सायरस पुनावाला यांचं वक्तव्य

आज पुण्यात डॉ. सायरस पूनावाला यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरण, लॉकडाऊनबाबत आपली भूमिका मांडली.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus