मुंबई 16 जानेवारी : कोलकता रेल्वे स्थानकावर गाणं गाणारी रानू मंडल आता सर्वानाच माहित आहे. रानू मंडलचे गाणे एका रात्रीत सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तिचे व्हायरल झालेले गाणे ऐकुन बॉलिवूड संगीतकार आणि कलाकार हिमेश रेशमिया याने तिला आपल्या ‘हैप्पी हार्डी एंड हीर’ या सिनेमामध्ये गाणे गाण्याची संधी दिली होती. त्या सिनेमामधील ‘तेरी मेरी काहानी’ हे रानू मंडलचे गाणे देखील व्हायरल झाले होते. मात्र हे गाणे सध्या आणखी एका कारणासाठी व्हायरल होत आहे. यामागचे कारण ऐकाल तर नक्कीच हसाल. रानू मंडलने गायलेलं गाणं हार्मोनियमवर वाजवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फक्त हार्मोनियमवर त्याने रानू मंडलचं गाणं गायलं म्हणून व्हायरल होतो आहे असं नाही. तर त्यामागचं कारण वेगळंच आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, व्यक्ती रानू मंडलचे “तेरी मेरी कहानी” हे गाणं हार्मोनियमवर वाजवत आहे. याचवेळी त्याच्या शेजारी इमानदार प्राणी म्हणून ओळख असलेला कुत्रा त्याची नक्कल करत आहे. या व्हिडिओला “अर्ली मोर्निग रियाज” असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. कुत्रा हार्मोनियमच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. संगीतप्रेमी श्वानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच हा वर्षभरातला सर्वात कॉमेडी व्हिडिओ असल्याचंही लोकांनी सांगितले आहे. हा व्हिडिओला 12 जानेवारीला पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर त्याला 1.3 अब्ज लोकांनी पाहिलं आहे तर 35 हजार लोकांनी शेअर केला आहे, या व्हिडिओवर 9 हजारापेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत. चोरीचा डाव फसला, दुकानदारानंचं असा शिकवला धडा, पाहा VIDEO