Home /News /videsh /

वाढदिवसाला मिळालं आयुष्याचं गिफ्ट, कोरोनातून बरी झालेली डॉक्टर तरुणी पुन्हा रुग्णांच्या सेवेत

वाढदिवसाला मिळालं आयुष्याचं गिफ्ट, कोरोनातून बरी झालेली डॉक्टर तरुणी पुन्हा रुग्णांच्या सेवेत

कोरोनातून बरी झालेली डॉक्टर तरुणी म्हणते की, एक वेळ अशी आली की सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण कुटुंबिय आणि मेडिकल स्टाफने माझी काळजी घेतली.

    मॅनिला, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाग्रस्तांना वाचवण्यासाठी काम करत आहेत. दरम्यान, डॉक्टर्सनाही कोरोना झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फिलिपाइन्समध्ये एका डॉक्टर तरुणीला कोरोना झाला होता. त्यातून सुखरुप बाहेर पडल्यानंतर तिनं वयाच्या 27 व्या वर्षात पदार्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानले आहेत. फेसबुकवर डॉक्टर कार्मिना फुएन्टाबेल्ला हिने पोस्ट करून सर्वांचे आभार मानले. यात तिनं कोरिअन फिंगर हर्टचे चिन्ह दाखवत असलेला फोटो पोस्ट केला आहे. ती म्हणते की, आज 24 एप्रिलला मी माझा 27 वा वाढदिवस साजरा केला. हे मला आतापर्यंतचं सर्वात बेस्ट गिफ्ट आहे म्हटलं तरी हरकत नाही. वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. फोटो, पत्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तिने आभार मानले. कार्मिना असंही म्हणाली की, तिला अजुनही माहिती कल्पना नाही की तिच्यासोबत काय झालं. पण संपूर्ण कुटुंब आणि मेडिकल स्टाफची मी आभारी आहे. या सर्वांनी माझी खूप काळजी घेतली असंही कार्मिना म्हणाली. एकवेळ अशी आली की मला हे सर्व संपल असल्यासारखं वाटलं. पण सर्वांचे प्रयत्न आणि प्रार्थना यामुळे मी पुर्णपणे बरी झाले. आता मला चांगलं वाटतं आहे आणि पुन्हा एकदा माझ्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी जाईन असंही कार्मिना म्हणाली. 'कोरोनाच्या या लढ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व सहकाऱ्यांसाठी ते सुरक्षित रहावेत अशी प्रार्थना करते. कोरोना सगळीकडे पसरत चालला आहे. अजुन आपल्याला बरीच मोठी लढाई लढायची आहे. आपण नक्कीच ही लढाई जिंकू पण त्याआधी काळजी घेणं गरजेचं आहे',असंही कार्मिना म्हणाली. हे वाचा : आपलं काही खरं नाही! लॉकडाऊनमधले देशभरातले हे PHOTO पाहून काय म्हणाल? कार्मिना आता पुन्हा युनिव्हर्सिटी ऑफ सँटो टोमस हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. यावेळी आधीपेक्षा जास्त खबरदारी घेईन असं ती म्हणाली. फिलिपाइन्समध्ये आतापर्यंत 26 पैकी 19 आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आआहे. तर जवळपास 1 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वाचा : लग्नाच्या वाढदिवशीही ड्युटीवर, डॉक्टर दाम्पत्याची कहाणी ऐकून कराल कौतुक संकलन, संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या