नवी दिल्ली, 27 मे : देशभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन 4.0 (Lockdown 4.0) लागू करण्यात आला आहे. मात्र 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे खासगी विमान कंपनी इंडिगोमधून (IndiGo) प्रवास करणारा एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus Positive) असल्याचं आढळलं आहे. सोमवारी घरगुती उड्डाण सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह सापडल्याची ही पहिली घटना आहे. दरम्यान, या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रु मेंबर यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सर्वांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल. याचबरोबर एअर इंडिया विमानात प्रवास करणारी व्यक्तीही कोव्हिड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. एअर इंडियाच्या (Air India) वतीने, 26 मे रोजी दिल्ली-लुधियाना AI9I837 विमानात प्रवास करणारा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. वाचा- रेल्वे प्रवासात एकाच दिवसात 7 मजुरांचा मृत्यू; कारण ऐकून बसेल धक्का एअर इंडियाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, एलायन्स एअरच्या सुरक्षा विभागात काम करणारा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळल्यानंतर सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
One passenger on today's AI9I837 Delhi-Ludhiana flight has been found #COVID19 positive. The passenger who works in the security department of Alliance Air was traveling on a paid ticket. All the passengers of this flight are now under state quarantine: Air India pic.twitter.com/KlwF9g64Mc
— ANI (@ANI) May 26, 2020
वाचा- कोल्हापूरसाठी कोरोनाबाबत आजपर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी चेन्नई कोईम्बतूर प्रवास करताना सापडला कोरोना पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी चेन्नई ते कोईम्बतूर इंडिगो 6E 381नं प्रवास करत होता. कोईम्बतूर विमानतळावरच डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला सध्या कोईम्बतूर येथील ESI सुविधा केंद्रात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. वाचा- WHO ने ट्रायल थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा का होतोय वापर? प्रवाशानं पाळले होते सर्व नियम उड्डाणासाठी एक विशेष नियमावली आखण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या प्रवाशानेही फेस मास्क, फेस शील्ड आणि ग्लोव्ह्ज घातले होते. एअरलाइन्स कंपनीच्या वतीने असे म्हटले आहे की प्रवाशा शेजारी कोणी बसले नव्हते, त्यामुळं कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बरीच कमी आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.