Home /News /national /

WHO ने ट्रायल थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा का होतोय वापर?

WHO ने ट्रायल थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा का होतोय वापर?

Hydroxychloroquine चे कोरोना रुग्णांवर होणारे दुष्परिणाम पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याचं ट्रायल थांबवलं आहे.

    निखिल घाणेकर/नवी दिल्ली, 26 मे : कोरोनाव्हायरसविरोधात सध्या कोणतं औषध नाही. सध्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांचं ट्रायल कोरोनावर उपचारासाठी केलं जातं आहे. त्यापैकी एक औषध आहे ते म्हणजे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine). मात्र या औषधाचे कोरोना रुग्णांवर होणारे दुष्परिणाम पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) या औषधाचं ट्रायल थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही भारतात याचा प्रयोग सुरूच आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) आरोग्य कर्मचाऱ्यांवर या औषधाचा प्रयोग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं की, "या औषधाच्या प्रयोगाबाबत मार्चमध्येच सूचवण्यात आलं होतं. प्रयोगापूर्वी एक परीक्षण करण्यात आलं होतं. त्यावेळी या औषधामध्ये अँटिव्हायरल गुण दिसून आले होते" हे वाचा - कोरोनाचे रुग्ण अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतूनच पडले बाहेर, धक्कादायक प्रकार भार्गव म्हणाले, "हे औषध प्रायोगिक तत्वावर वापरलं जातं आहे, भारतातील आकडेवारीनुसार या औषधाचा प्रयोग करण्यात काहीतच समस्या नाही, मात्र फायदा आहे. भीती, उलटी याशिवाय इतर गंभीर असे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. हे औषध कोरोनाविरोधात काम करू शकतं. त्यामुळे या औषधाचा प्रयोग रोगप्रतिरोधक म्हणून सुरूच राहिलं असं आम्ही स्पष्ट केलं आहे" हे वाचा - मास्क घातलाय? सोशल डिस्टन्सिंग ठेवताय? तुमच्यावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर कोविड-19 ला रोखण्यात हे औषध प्रभावी ठरेल असा विचार केला आणि त्याबाबत केला अभ्यासाचा परिणाम पाहता आम्ही वैद्यकीय देखरेखीत अनुभवी तज्ज्ञांकडून या औषधाचा प्रयोग करू शकतो, असं ICMR ने केंद्र सरकारला सांगितलं. त्यानंतर आता या औषधाचा प्रयोग भारतात सुरूच ठेवला जाणार आहे. मात्र त्याच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मंगळवारी निर्देश जारी केले आहे. एचसीक्यूची उपलब्धता आणि विक्रीबाबत अपडेटेड माहिती केंद्राला देण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने केल्यात. कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या