• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • रेल्वे प्रवासात एकाच दिवसात 7 मजुरांचा मृत्यू; कारण ऐकून बसेल धक्का

रेल्वे प्रवासात एकाच दिवसात 7 मजुरांचा मृत्यू; कारण ऐकून बसेल धक्का

लॉकडाऊन लागू केल्यानंतर विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्रास सहन करावा लागला

 • Share this:
  पाटणा, 26 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर प्रवाशांचा रस्ते दुर्घटना किंवा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला आहे. यातून या मजुरांची सुटका व्हावी यासाठी श्रमिक रेल्वेही सुरु करण्यात आली खरी, मात्र हा रेल्वेप्रवासही या मजुरांसाठी काळ ठरतो आहे. दुर्दैवाच्या विळख्यात सापडलेल्या या मजुरांचा रेल्वे प्रवासातही मृत्यू होतो आहे. प्रवासी मजूर प्रवास करीत असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे अनेक ठिकाणी उशिराने धावत आहेत. ज्या रेल्वेचा पल्ला लांबचा आहे, त्या रेल्वे निर्धारित ठिकाणी पोहचण्यात फारच वेळ लावत आहेत. या प्रवासात अन्नपाण्यावाचून आणि उष्णतेमुळे मजुरांना प्राणाला मुकावे लागत आहे. सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात एका आठ महिन्यांच्या लहानग्याचाही समावेश आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यापूर्वीच अन्नपाण्याची कमतरता आणि वाढता उन्हाळा हा या मजुरांसाठी मृत्यू म्हणून उभा ठाकला आहे. सोमवारी या प्रवासी मजुरांचा झाला मृत्यू 1. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी इरशाद यांचा मुजफ्फरपूर जंक्शन येथे मृत्यू. 2. 55 वर्षीय अनवर यांचा बैरोनी येथे मृत्यू, मुंबईतून सुरु केला होता प्रवास 3. सूरतहून बिहारकडे येणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेचा सासाराम स्टेशनवर मृत्यू 4. महाराष्ट्रातून येणाऱ्या मोतिहारीच्या मजुराचा जहानाबादमध्ये मृत्यू 5. मुंबईहून सीतामढीला निघालेल्या कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाचा कानपूरमध्ये मृत्यू 6. अहमदाबादहून कटिहारला जाणाऱ्या अलवीनाचा रेल्वे प्रवासात मृत्यू रेल्वे अधिकाऱ्यांचे काय म्हणणे रेल्वेला होणारा विलंब आणि रेल्वेतील अन्नपाणी सुविधेबाबत पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही मजुराचा भूकेमुळे मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यातील काही मजुरांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. श्रमिक विशेष रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांना सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत रेल्वेतर्फे वेळेवर जेवण दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. निरनिराळ्या स्टेशनांवर यासाठी फूड सेंटर उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलीय. ज्या वेळी स्टेशनवर रेल्वे येते, तेव्हा रेल्वेतील सर्वांना अन्न-पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याचश्या रेल्वे गाड्या या बऱ्यापैकी वेळेवर धावत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना काहीसा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र कोणतीही रेल्वे ही पाच किंवा सात दिवसांच्या उशिराने धावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: