नवी दिल्ली, 27 एप्रिल : जगभरातील सर्व देशांमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधील विमान उड्डाणं पूर्ण बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत काही वैमानिक मात्र बचाव मोहीम, औषधं आणि आवश्यक साहित्य इतर देशांमध्ये घेऊन जाण्यात व्यस्त आहेत. असेच 20 पेक्षा जास्त विमानातून आवश्यक सामना घेऊन गेलेले कॅप्टन अमरिंदर सिंग धालीवाल सध्या शांघायमध्ये आहेत. मात्र त्यांनी चीनमधील लोकांकडून मिळालेल्या वागणुकीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या शांघायमध्ये असलेले अमरिंदर यांनी सांगितले की, “शांघायमध्ये सर्वात जास्त वेळ लागतो. भारतातून तेथे मदत सेवा पुरवली जात आहे असं असूनही येथील लोकांचे वर्तन वाईट आहे. त्यांना असं वाटतं की त्यांचा देश साथीच्या आजारापासून मुक्त झाला आहे. अशा परिस्थितीत ते परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाकडं संशयाच्या नजरेनं पाहतात. त्यांना अशी भीती आहे की बाहेरून येणारी व्यक्ती व्हायरसच्या संसर्ग घेऊन येत आहेत”. चीनमधील वुहानमधून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. दरम्यान वुहानमधील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळं चीन कोरोनामुक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. वाचा- ‘…तर पुन्हा कोरोनाचा प्रसार होणार’, वैज्ञानिकांनी चीनला दिला इशारा ‘आम्हाला विमानातून बाहेर पडण्याची परवानगी नाही’ कॅप्टन धालीवाल म्हणाले की, त्यांनी 29 मार्च रोजी इराणमधून 136 लोकांना मायदेशी आणलं होते. यापूर्वी त्यांनी चीन, आखाती देश तसेच ढाका, यांगून आणि मालदीव या देशांमध्ये मदत उड्डाणं सुरू केली आहेत. ते म्हणाले की, “जेव्हा जेव्हा आमची उड्डाण शांघाय विमानतळावर येताच तेव्हा आम्हाला विमानातून बाहेर येण्याची परवानगी देत नाहीत”. चीनच्या मते त्यांच्या देशाला परदेशी नागरिकांपासून जास्त धोका आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या कमी असली तरी, परदेशी नागरिकांमुळं या संख्येत वाढ होऊ शकते. वाचा- ज्या विहानमधून जगभर कोरोना पसरला तिथे आता एकही रुग्ण नाही! ‘इतर विमानांपासून विदेशी विमाने वेगळी ठेवली जातात’ याव्यतिरिक्त, चिनी विमानतळ कर्मचारी फक्त त्यांची भाषा बोलतात. इंग्रजीमध्ये संवाद साधत नसल्यामुळं काही चौकशी करता येत नाही. तसेच, जेव्हा जेव्हा विमान परदेशातून येते तेव्हा मुख्य मार्गापासून वेगळे उभे राहण्यास सांगितलं जातं जेणेकरुन परदेशी भाषा जाणणारे कर्मचारी त्यांच्याशी चर्चा करू शकतील. स्पाइसजेट कॅप्टन धालीवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी डॉक्टर आहे, ती अनेकदा सेफ्टी टिप्स देतात. या टिप्स आठवून धलीवाल प्रवास करतात. वाचा- कोरोनाविरोधातील लढाई आता आणखी अवघड, लसीबाबत ब्रिटनमधून आली मोठी बातमी संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.