मुलींची छेड काढाल तर याद राखा, पहिले 'रेड कार्ड' नंतर मिळणार ही शिक्षा

शहरांमध्ये ज्या ठिकाणी वारंवार छेड काढली जाते अशी ठिकाणे शोधण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:46 PM IST

मुलींची छेड काढाल तर याद राखा, पहिले 'रेड कार्ड' नंतर मिळणार ही शिक्षा

लखनऊ 27 जून : मुलींची होणारी छेडखानी रोखण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अँटी रोमीयो पथकाची स्थापन केली होती. आता राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना लगाम लावण्याचा सरकारचा विचार आहे. पोलिसांनी अशा समाजकंटकां विरूद्ध कठोर उपाययोजना कराव्यात असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. छेडखानी करणाऱ्यांना पहिल्यांदा पकडल्यानंतर त्यांना रेड कार्ड मिळणार असून दुसऱ्यांना पकडले गेल्यास त्यांची रवानगी थेट जेलमध्येच होणार आहे.

शहरांमध्ये ज्या ठिकाणी वारंवार छेड काढली जाते अशी ठिकाणे शोधण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय. अशा ठिकाणी साध्या वेशातले पोलीस लक्ष ठेवणार असून छेडखानी करणाऱ्यांना त्याच ठिकाणी धडा शिकवणार आहेत. पोलिसांनी खास रेड कार्डही तयार केले आहेत. त्या कार्डवर छेड काढणाऱ्या आरोपींची माहिती, फोटो, पत्ता अशी सगळी माहिती असणार आहे.

याचा डाटाबेस पोलीस त्यांच्याकडेही ठेवणार आहेत. पहिल्यांदा छेड काढली तर हे कार्ड दिलं जाईल. नंतर पुन्हा गुन्हा केल्यासं आढळल्यास अशा लोकांना सरळ तुरुंगात टाकलं जाणार आहे. सरकारने केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी सरकारने कॉलेजमधल्या मुलींना एक फॉर्म दिलीय. सगळ्या मुलींकडून हे फॉर्म्स भरून घेतले जाणार आहेत. त्यात त्यामुलींनी जो फिड बॅक दिला असेल त्याचाही पोलीस विचार करणार असून नियमांमध्येही सुधारणा केली जाणार आहे.

गुन्हेगारांना दहशत बसावी यासाठी सरकाने धडक मोहिम राबवली होती अनेक गुंडांना चकमकीत ठार केलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा असे आदेशच मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...