Home /News /national /

BREAKING: भारतीय पत्रकाराची अफगाणिस्तानात हत्या; दानिश सिद्दीकींना मारण्यात तालिबानचा हात

BREAKING: भारतीय पत्रकाराची अफगाणिस्तानात हत्या; दानिश सिद्दीकींना मारण्यात तालिबानचा हात

Breaking News: अफगाणिस्तानमध्ये वार्तांकन करणारे Photojournalist दानिश सिद्दिकी (Danish Siddiqui) यांची तालिबान्यांनी हत्या केली आहे. सिद्दिकी पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार होते.

    काबुल, 16 जुलै: अफगाणिस्तान (Afghanistan) मधले भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी (Indian Photo Journalist Danish Siddiqui) यांची कट्टरपंथीय तालिबान्यांनी हत्या केली आहे. दानिश रॉयटर्स (reuters) या न्यूज एजन्सीसाठी काम करत होते. Photojournalist म्हणून काम करत असताना अस्वस्थ अफगाणिस्तानातली हिंसा, तालिबानी अतिरेक्यांचा कहर अनेक वेळा कॅमेऱ्यात टिपला होता. ते पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार होते. काही दिवसांपूर्वी ते कंदाहारची सद्यस्थिती टिपण्यासाठी तिथे  काम करत होते. तालिबानी अतिरेकी आणि अफगाणिस्तानचं लष्कर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकींचं ते वार्तांकन करत होते. काही दिवस ते याच विषयाच्या मागे होते. त्यातच शुक्रवारी त्यांची हत्या करण्यात आली. अफगाणिस् दानिश यांची हत्या नेमकी कुणी केली आणि का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी south asian पत्रकार म्हणून तालिबान्यांनीच त्यांना मारल्याचं सांगण्यात येत आहे. VIDEO: भारतीय सैन्याचं यश, लष्कर ए तोयबाच्या आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान अफगाणिस्तानचे राजदूक फरीद ममूदे यांनी शुक्रवारी याबाबत त्यांच्या twitter वरून माहिती दिली. दानिश सिद्दीकी यांनी करिअरची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. नंतर ते फोटोग्राफीकडे वळले आणि रॉयटर्ससाठी फोटो जर्नालिस्ट म्हणून ते काम करत होते. 13 जुलैला त्यांनी कंदाहारमधून केलेलं ट्वीट शेवटचं ठरलं. रात्रभर चाललेल्या चकमकींविषयी त्यांनी लिहिलं होतं आणि फोटो, व्हिडीओही टिपले होते. 2018 मध्ये रोहिंग्य शरणार्थींबाबतच्या बातम्या आणि कव्हरेजबद्दल त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या