नवी दिल्ली, 04 जून : सरकारनं कोविड-19 महामारीच्या संकटामुळं (Covid-19 Pandemic)भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. व्हिसाची ही वाढ निःशुल्क करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं की, मार्च 2020 पासून कोविड संकटामुळं प्रवासी विमानसेवा बंद असल्यामुळं अनेक विदेशी नागरिक भारतात अडकले आहेत. हे सर्व वैध भारतीय व्हिसावर भारतात आले होते.
(वाचा-पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य)
लॉकडाउनमुळं अशा विदेशी नागरिकांसमोर व्हिसा वाढवण्यात अनेक अडचणी येत होता. त्यामुळं गृह मंत्रालयानं 29 जून, 2020 ला आदेश जारी केला होता. त्या आदेशात सरकारनं असं म्हटलं होतं की, ज्या विदेशी नागरिकांचा व्हिसा 30 जूननंतर संपण्याच्या स्थितीत असेल त्यांचा व्हिसाचा कालावधी उड्डाणं पुन्हा सुरू होणच्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत मोफत वैध मानला जाईल.
(वाचा-भारतात लहान मुलांना Pfizer ची कोरोना लस देण्याआधी ब्रिटनकडून आली मोठी माहिती)
दंड लागणार नाही
गृह मंत्रालयानं एका वक्तव्यामध्ये म्हटलं होतं की, असे विदेशी नागरिक मासिक आधारावर व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करतात. पण विमानांची उड्डाणं पुन्हा सुरू होणं शक्य नसल्याच्या परिस्थितीमध्ये मंत्रालयाने या मुदतीबाबत पुनर्विचार केला आहे. त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की, भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांसाठी व्हिसाचा कालावधी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वैध मानला जाईल. जास्तवेळ राहिल्यानं असा विदेशी नागरिकांवर दंड लागणार नाही. अशा विदेशी नागरिकांना त्याच्या व्हिसाचा कालावधी वाढवण्यासाठी ‘एफआरआरओ किंवा एफआरओ’ कडे अर्ज सादर करण्याची गरज नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Visa