लंडन, 04 जून : जगभरामध्ये कोरोनाचे नवे स्ट्रेन्स (New Covid Strains) लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणासाठी (Child Vaccination) प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गतच ब्रिटनच्या मेडिसिन रेग्युलेटरी बॉडीने अमेरिकेची फार्मा कंपनी फायजरची लस (Pfizer Vaccine)12-15 वर्षाच्या मुलांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. या वयोगटातील मुलांसाठी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
(वाचा-लहान मुलांना कोरोना लस देण्यासाठी धडपड; अवघ्या काही तासांतच 3 मोठ्या अपडेट)
ब्रिटनच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, या लसीची 12 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही लस या वयोगटातील मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं समोर आलं आहे. यात कोणत्याही प्रकारे धोका असल्याचं समोर आलेलं नाही. मात्र अजूनही देशातील लस तज्ज्ञांच्या समितीच्या निर्णयावर या वयोगटातील मुलांना लस द्यायची की नाही याचा निर्णय होणार आहे.
2000 मुलावर चाचणी
या लसीच्या वैद्यकीय चाचणीमद्ये 200 मुलांचा समावेश करण्यात आला होता. कमिशन ऑन ह्युमन मेडिसीनचे अध्यक्ष प्रोफेसर सर मुनीर पीरमोहम्मद म्हणाले की, मुलांची चाचणी घेताना आम्ही विशेष काळजी घेतली आहे. विशेषतः साईड इफेक्ट होतात का, याची काळजी घेण्यात आली आहे.
(वाचा-खळबळजनक! कोरोना आता घेतोय प्राण्यांचाही जीव; कोविड पॉझिटिव्ह सिंहाचा मृत्यू)
अमेरिकेतही परवानगी
यापूर्वी अमेरिकेतही फायजरच्या लसीचा वापर 12 वर्षांपुढील मुलांसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मे महिन्यात 2,000 पेक्षा अधिक जणांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या आधारावर फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशननं म्हटलं होतं की, फायजरची लस सुरक्षित आहे आणि 12 ते 15 वयोगटातील मुलांना मोठी सुरक्षा देते. फायजर आणि बायोएनटेकनं नुकतीच युरोपमधील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे.
मॉडर्नाची लस 12-17 वयोगटासाठी फायदेशीर
नुकतीच अशीही बातमी समोर आली होती की, मॉडर्नाची लस 12-17 वयोगटातील अत्यंत फायदेशीर ठरत आहे. कंपनीच्या मते, या वयोगटातील त्यांची लस लक्षण असलेला संसर्ग रोखण्यात 100 टक्के परिणामकारक ठरल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus