मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य

गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य

आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाशिम, 4 जून : स्थानिक गुन्हे शाखा वाशिम (Washim Crime news) येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान पोलीस निरीक्षकावर त्यांच्याच खात्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात 2007 मध्ये विश्वकांत गुट्टे हे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असतांना त्यांची सदर महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत 30 मे 2021 रोजी वाशिम इथं विश्वकांत गुट्टे हे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी आले असता त्यांनी जबरदस्ती करीत अत्याचार केल्याची तक्रार वाशिम शहर पोलिसांत दिल्यानं आरोपी विरुद्ध 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करीत आहेत.

हे ही वाचा-अशा फ्रेंड रिक्वेस्टपासून सावधान! जाळ्यात अडकवून करतायेत न्यूड व्हिडिओ चॅट, मग..

आपल्याच खात्यातील एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कोणती कारवाई पोलीस विभाग करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, WASHIM NEWS