नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (PM Modi meeting with leaders and CEO of major oil companies) जगातील तेल कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करत असून तेलाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भारतात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या (Price hike of petrol, diesel and gas) किंमती गगनाला भिडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोलिअम उत्पादनांवर होत आहे. त्यावर नेमका काय आणि कसा तोडगा काढता येईल, यावर या बैठकीत चर्चा होत आहे.
PM Modi interacts with top oil and gas CEOs; The interaction is attended by Mukesh Ambani, Chairman & Managing Director, Reliance Industries Limited, Dr. Igor Sechin, Chairman & CEO, Rosneft, Russia and Amin Nasser, President & CEO, Saudi Aramco among others pic.twitter.com/vFoom4PN1b
— ANI (@ANI) October 20, 2021
जगभरातील तेल कंपन्यांचे प्रमुख उपस्थित
या बैठकीला रिलायन्स इंडिया लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी, रशियाच्या रॉसनेफ्टचे चेअरमन आणि सीईओ डॉ. इगोर सेचिन आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि सीईओ अमीन नासेर उपस्थित आहेत. याशिवाय ब्रिटनच्या ब्रिटीश पेट्रोलिअमचे सीईओ बर्नार्ड लुनी, अमेरिकेच्या श्लमबर्जर लिमिटेडचे सीईओ ओलिवर ली पेच, हनीवेलचे प्रेसिडंट आणि सीईओ ब्रायन ग्लोवर हेदेखील आपलं मत मांडणार आहेत.
या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची ही सहावी बैठक आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत चर्चा करायला सुरुवात केली होती. तेल निर्मिती आणि वितरणाच्या क्षेत्रातील आव्हानं, गुंतवणुकीच्या नव्या संधी, करपद्धतीतीत संभाव्य बदल यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होणं, गॅसवर आधारित अर्थव्यवस्था, हरित ऊर्जेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाकडं पाऊल टाकणं, हरित हायड्रोजन अर्थव्यवस्था, ऊर्जेची आत्मनिर्भरता यासारख्या मुद्द्यांवरदेखील या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
हे वाचा- अरुण वाल्मिकीचा तुरुंगात मृत्यू, आग्र्याला जाणापासून प्रियंका गांधींना रोखले
तेलावरील अवलंबित्व कमी करणं, ग्रीन एनर्जीच्या दिशेनं पावलं टाकणं आणि इंधनाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याच्या दिशेनं प्रयत्न करणं या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Petrol and diesel