जम्मू काश्मीर, 12 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir)मधील पुंछ सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोमवारी भारतीय जवान शहीद झाले होते. या जवानांच्या बलिदानानंतर आता भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. (5 terrorist killed by Indian Army) पुंछ नंतर शोपियान येथील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. 5 दहशतवाद्यांचा खात्मा काश्मीरमधील शोपिया येथे भारतीय सैन्य दलाने 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरलं होतं. हे दहशतवादी लष्कर ए तोयबा चे दहशतवादी होते. भारतीय सैन्य दलाने या दहशतवाद्यांचा खात्मा करुन बदला घेतला आहे. यापूर्वी भारतीय सैन्य दलाने सोमवारी अनंतनाग आणि बांदीपोरा येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
Shopian encounter, Jammu and Kashmir | Out of three killed terrorists, one terrorist has been identified as Mukhtar Shah of Ganderbal, who shifted to Shopian after killing one street hawker Virendra Paswan of Bihar: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/wngrnv7OVr
— ANI (@ANI) October 11, 2021
जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाकडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोपियान चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दहशतवाद्यांचा खात्मा केला त्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त कऱण्यात आला आहे. अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव मुख्तार शाह असल्याची माहिती समोर आली आहे. 24 तासांत तीन चकमक जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी सांगितले की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सायंकाळी शोपिया परिसरता दोन सर्च ऑपरेशन हाती घेतले. शोपिया येथील तुलकरानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणअयात आला. त्याचवेळी खेरीपोरा येथे आणखी एका ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या ठिकाणी अद्यापही चकमक सुरू आहे. गेल्या 24 तासांतील ही तिसरी चकमक आहे. सोमवारी 5 भारतीय जवान शहीद जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी चकमक झाली. या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद झाले. पूँछ जिल्ह्यात ही चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 4 दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूँछला जिल्ह्यात घुसखोरी केली होती. त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाले. भारतीय सुरक्षा दलानं मुगल रोडजवळील डेरा की गली परिसरात या चार दहशतवाद्यांना घेरलं, त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला. या चकमकीत पाच सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच पाचही जवानांचा मृत्यू झाला.