जाहिरात
मराठी बातम्या / देश / सर्वसामान्य नागरिकांना 3 वर्षांसाठी जाता येईल सैन्यात, टूर ऑफ ड्युटीच्या प्रस्तावावर होणार विचार

सर्वसामान्य नागरिकांना 3 वर्षांसाठी जाता येईल सैन्यात, टूर ऑफ ड्युटीच्या प्रस्तावावर होणार विचार

सर्वसामान्य नागरिकांना 3 वर्षांसाठी जाता येईल सैन्यात, टूर ऑफ ड्युटीच्या प्रस्तावावर होणार विचार

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सर्वसामान्य नागरिकांना तीन वर्षे लष्करात सेवा बजावता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मे : भारतीय लष्करात देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही सेवा बजावण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. लष्कराकडून टूर ऑफ ड्युटीच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सर्वसामान्य नागरिकांना तीन वर्षे लष्करात सेवा बजावता येणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एका प्रस्तावावर विचार केला जात आहे ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना देशसेवेची संधी मिळू शकेल. तीन वर्षांच्या टूर ऑफ ड्युटी अंतर्गत ही संधी मिळू शकते. प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर लष्कराच्या प्रवक्त्यांनीसुद्धा याला दुजोरा दिला असल्याचं वृत्त नवभारत टाइम्स ने दिलं आहे. भारतीयल लष्कर देशातील बेस्ट टॅलेंट सेवेसाठी घेण्यास इच्छुक आहे. या प्रस्तावामुळे लष्कराचा हा हेतू पूर्ण होऊ शकतो. सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून लष्करात भरती होणाऱ्यांना कमीत कमी 10 वर्षे सेवा करावी लागते. यापेक्षा कमी कालावधीसाठी लष्करात नोकरी करण्याची तरतूद नाही. हे वाचा : कोरोनामुळे पती गमावलेल्या शिक्षिकेलाही लागण, तिनेही दुसऱ्याच दिवशी सोडले प्राण सध्या वरिष्ठ अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या तरतुदींची समीक्षा करत आहेत. यात तरुणांसाठी जास्तीजास्त संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय लष्करात अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांची उणीव भासत आहे. यामुळे कमिशनमध्ये बदल करण्याचा विचार आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनची सुरुवात किमान 5 वर्षे सर्व्हिससह झाली होती. मात्र ती पुन्हा 10 वर्षांपर्यंत करण्यात आली होती. हे वाचा : मृत्यूचे आकडे मोजतंय अमेरिकेतील ते घड्याळ; नाव दिलंय ‘ट्रम्प डेथ क्लॉक’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात