न्यूयॉर्क, 13 मे : जगभरात कोरोनाचा हाहाकार वाढत आहे. वाढत जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वॉयर येथे एक नवा बिलबोर्ड लावण्यात आला आहे. लोकांनी याला ट्रम्प डेथ क्लॉक असं नाव दिलं आहे. हा बोर्ड लावणाऱ्याचं म्हणणं आहे की, कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग पसरल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्याने ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्या मृतांचा आकडा मोजण्याचे काम हे घड्याळ करीत आहे. हे घड्याळ फिल्ममेकर यूजीन जेर्की यांनी डिझाइन केलं आहे. दरम्यान अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 83000 च्या पार गेली आहे. सोमवारपर्यंत या घड्याळानुसार 48000 हून जास्त असे मृत्यू आहेत ज्यांचा बचाव करता येऊ शकला असता. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका पत्रकार परिषदेत चिडले होते. सध्या अमेरिकेत संक्रमितांचीसंख्या 13 लाख 92000 इतकी असून मृतांची संख्या तब्बल 83000 इतकी आहे. असे असतानाही ट्रम्प लॉकडाऊन हटविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने नागरिकांमध्ये त्याचा राग आहे. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रम्प लॉकडाऊन उठवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेत हजारो लोक कामावर परतले आहे, मात्र त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या एका सहकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित - रोजगार नाही, मालकानेही घराबाहेर काढलं; 4 मुलींसह दाम्पत्याचा जोखमीचा प्रवास चहलनं अनुष्काकडे केली होती ‘ही’ खास मागणी, आता विराटनं त्यालाच केलं ट्रोल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.