कोरोनामुळे पती गमावलेल्या शिक्षिकेलाही लागण, तिनेही दुसऱ्याच दिवशी सोडले प्राण

कोरोनामुळे पती गमावलेल्या शिक्षिकेलाही लागण, तिनेही दुसऱ्याच दिवशी सोडले प्राण

दिल्ली सरकारने एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी मनोज तिवारी यांनी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्त पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पेशानं शिक्षिका असलेल्या या महिलेला रेशन वाटण्याचं काम देण्यात आलं होतं. अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती खालवली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला 2 मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं होतं. 3 मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 4 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर कोरोनाचा रिपोर्ट आला. आलेल्या अहवालानुसार त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

हे वाचा-बैलानं पाठ खाजवली आणि 700 घरांची वीज गेली, काय आहे नेमका प्रकार वाचा

दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी शिक्षकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तिवारी म्हणाले, बुरारीमध्ये रेशन वाटप करण्यासाठी कर्तव्य बजावत असताना शिक्षकाचा मृत्यू झाला. दिल्ली सरकारने एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी मनोज तिवारी यांनी केली आहे.

करोल बाग झोनचे मलेरिया इन्स्पेक्टरही संक्रमित असल्याचे आढळले आहे. त्याला तातडीने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे प्राथमिक तपासणीनंतर घरी अलग ठेवून राहण्याच्या सल्ल्याने त्याला सोडण्यात आले. अधिका said्याने सांगितले की, निरीक्षकांच्या संपर्कात आलेल्या १ लोकांना त्यांच्या घरात संगरोधात राहण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, या लोकांमध्ये अद्याप कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

हे वाचा-गावी जाण्यासाठी उपाशी पोटी 300 किमी चालला, 21 वर्षाच्या मजुराचा वाटेतच मृत्यू

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 13, 2020, 5:50 PM IST

ताज्या बातम्या