जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' स्कीमला का होतोय देशभरात विरोध? काय आहे तरुणांचं म्हणणं? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' स्कीमला का होतोय देशभरात विरोध? काय आहे तरुणांचं म्हणणं? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

उमेदवाराचं म्हणणं नेमकं आहे तरी काय?

उमेदवाराचं म्हणणं नेमकं आहे तरी काय?

हा नेमका विरोध कशासाठी? (why students protesting against Agneepath scheme?) देशभरातील सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराचं म्हणणं नेमकं आहे तरी काय?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून: अग्निपथ योजनेंतर्गत वर्षभरात 96 हजार सैनिकांची भरती (what is Agnipath scheme?) करण्यात येणार आहे. यातील 40 हजार भरती लष्करासाठी आणि उर्वरित भरती हवाई दल आणि नौदलासाठी केली जाणार आहे. यातील पहिली भरती पुढील 90 दिवसांत होणे अपेक्षित आहे. देशभरातील तरुण तिन्ही सैन्यात भरती सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे या स्कीम देशभरातून तरुणांचा विरोधी (students protesting against Agnipath scheme) होताना दिसून येतोय. मात्र हा नेमका विरोध कशासाठी? (why students protesting against Agnipath scheme?) देशभरातील सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराचं म्हणणं नेमकं आहे तरी काय? का देशभरात जाळपोळ करण्यात येतेय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये लष्करी स्तरावर भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर देशभरात त्याचा विरोध सुरू आहे. कुठे रस्ते अडवले जात आहेत तर कुठे रेल्वे जाळली जात आहे. आंदोलनानंतर दबावाखाली आलेल्या केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचा काहीही उपयोह होताना दिसून येत नाहीये. अजूनही देशाच्या तब्बल अकरा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. Career After 10th: दहावीनंतर Polytechnic की 12वी? कोणता आहे बेस्ट पर्याय

सैन्यभरती थांबवल्याचा संताप

मुझफ्फरपूरच्या तरुणांचे म्हणणे आहे की नोकरीसाठी त्यांचे वय ओलांडत आहे आणि सैन्यात भरती थांबवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सेवांमधील भरती थांबवण्यात आली होती. त्यामुळे तयारी करताना अनेक तरुणांचं वय जास्त झालं आहे. म्हणूनच आता या योजनेअंतर्गत त्यांना सैन्यभरती मिळणार नाही. इतके वर्ष सैन्यात भरतीची स्वप्न बघणाऱ्या तरुणांना सैन्यभरती थांबवल्याचा संताप आला आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर काय? त्याचवेळी केंद्र सरकारच्या या योजनेत गैरसमज असल्याचे बक्सरच्या संतप्त विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. चार वर्षांनीच सेवानिवृत्ती दिली जाईल. पुढे काय करणार?18 ते 22 वयोगटातील 75% मुले 22-26 वयोगटात असताना सेवा संपल्यामुळे बेरोजगार असतील असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या योजनेमुले बेरोजगारी वाढण्याचा धोका अधिक आहे असंही काही तरुण म्हणताहेत. त्या’ तरुणांचं काय? चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी केडरमध्ये भरती केले जाईल, असा सरकारचा युक्तिवाद आहे. पण दहावी-बारावी उत्तीर्ण होऊन अग्निवीर झालेल्या 75% तरुणांचे काय? त्यांना दुसरी नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे काही योजना आहे का? असाही सवाल आंदोलनकर्त्या तरुणांकडून विचारण्यात येतोय. अजूनही संधी गेली नाही! MPSC कडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ अवघ्या सहा महिन्यात प्रशिक्षण? सैन्यात एक चांगला सैनिक तयार होण्यासाठी 7-8 वर्षे लागतात, अशा परिस्थितीत अग्निवीर अवघ्या 6 महिन्यांत कसा ट्रेंड करू शकेल. यासोबतच अग्निवीर जवानांना त्यांच्या कुटुंबाची काळजी नेहमीच सतावत असते. 3-4 वर्षे पूर्ण करून तो कसा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे इतक्या कमी वयात आणि कमी कालावधीत प्रशिक्षण आणि नोकरी अशक्य होईल असंही काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर अजून काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात