टेक्सास, 09 मे : अमेरिकेतील टेक्सास इथल्या एका मॉलमध्ये शनिवारी गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला. यात हैदराबादमधील एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. ऐश्वर्या रेड्डी असं तिचं नाव असून गेल्या पाच वर्षांपासून ती अमेरिकेत राहत होती. तिच्या मित्रासोबत मॉलमध्ये जात असल्याचं तिने आईला फोनवर सांगितलं होतं. हाच तिचा कुटुंबियांसोबतचा शेवटचा कॉल ठरला. हैदराबादमधील सरूरनगर इथं राहणाऱ्या ऐश्वर्याचा भावाने सांगितलं की, तिचं करिअर चांगलं सुरू होतं आणि नुकतंच तिला प्रमोशनही मिळालं होतं. २०२० मध्ये मिशिगन विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर टेक्सासमध्ये एका कंपनीत ती प्रोजेक्ट इंजिनिअर होती. २०१८ मध्ये अमेरिकेत जाण्याआधी ऐश्वर्याने उस्मानिया विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती. Weather Update Today: बंगालच्या उपसागरात मोचा सक्रीय, ‘या’ राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट ऐश्वर्या रेड्डीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार तिचं आईसोबत शेवटचं बोलणं झालं होतं. तेव्हा एका मित्रासोबत मॉलमध्ये जात असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर डलासमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच आईने तिला फोन केला पण काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर ऐश्वर्याचा फोन स्विच ऑफ लागला. अमेरिकेतच राहणाऱ्या ऐश्वर्याच्या दुसऱ्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसह रुग्णालयात चौकशी केली. तेव्हा ऐश्वर्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तिचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बुधवारपर्यंत मृतदेह भारतात पोहोचेल अशी अपेक्षा कुटुंबियांना आहे. ऐश्वर्या डिसेंबरमध्ये भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती. गेल्या चार महिन्यात अमेरिकेत जवळपास 200 गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. 30 एप्रिलला टेक्सासमध्येच सार्वजनिक ठिकाणी गोळीबार झाला होता. त्यात आरोपीने 5 जणांवर गोळीबार केला होता. यात एक 9 वर्षांचा मुलगाही होता. त्याआधी 17 एप्रिलला झालेल्या गोळीबारात 6 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.