• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • PM गतिशक्ती योजनेमुळे वेळेतच पूर्ण होणार सर्व प्रोजेक्ट्स; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला मास्टरप्लॅन

PM गतिशक्ती योजनेमुळे वेळेतच पूर्ण होणार सर्व प्रोजेक्ट्स; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला मास्टरप्लॅन

या योजनेच्या माध्यमातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतील, सामग्रीवरील खर्च कमी होईल

 • Share this:
  नवी दिल्ली13 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (13 ऑक्टोबर) `पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन` (PM Gati Shakti National Master Plan) लॉंच केला. 100 लाख कोटींच्या या योजनेसाठी रेल्वे आणि रस्ते यासह 16 मंत्रालयं एकत्रितपणे काम करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा (Infrastructure) विकास प्रकल्पांना गती येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी गतिशक्ती योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत सर्व विभाग एकमेकांच्या प्रकल्पांविषयी केंद्रीकृत पोर्टलव्दारे जाणून घेऊ शकणार आहेत. तसेच मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीमुळे लोक, वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीत एकसंधपणा आणि अखंड कनेक्टिव्हिटी राहणार आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं की  "गतिशक्ती योजना ही व्यापकता, प्राथमिकता, अनुकूलन, समकालीन, विश्लेषणात्मक आणि गतीशीलतास या सहा स्तंभांवर आधारित आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतील, सामग्रीवरील खर्च कमी होईल, पुरवठा साखळी सुधारेल आणि स्थानिक वस्तूंना जागतिक स्तरावर स्पर्धा निर्माण होईल". पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ केला. यामुळे सुमारे 100 लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांच्या विकासाला (Development) चालना मिळेल. या अंतर्गत 16 मंत्रालये आणि विभागांनी त्यांचे सर्व प्रकल्प `जीआयएस मोड`ला जोडले आहेत. हे प्रकल्प 2024-25 पर्यंत पूर्ण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "आत्मनिर्भर भारताच्या (Atmanirbhar Bharat) संकल्पासह आम्ही पुढील 25 वर्षांसाठी भारताचा पाया उभारत आहोत. पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन भारताला आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच्या संकल्पापर्यंत घेऊन जाणार आहे. हा नॅशनल मास्टर प्लॅन 21 व्या शतकातील भारताला गतिशक्ती देईल" हे वाचा- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात भरती देशातील शेतकरी, उत्पादक, व्यापार क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि नागरिक हे गतिशक्ती महाअभियानाच्या केंद्रस्थानी असतील. यामुळे भारताच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना 21 व्या शतकातील भारत घडवण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल, आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आपल्या देशात पायाभूत सुविधांचा विषय बहुतांश राजकीय पक्षांच्या प्राधान्यक्रमात अगदी शेवटी आहे. त्यांच्या घोषणापत्रात हा विषय दिसून येत नाही. त्यामुळे आता अशी स्थिती आली आहे की काही राजकीय पक्षांनी देशासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जगात ही एक स्वीकारली गेलेली गोष्ट आहे की शाश्वत विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे हा एकमेव मार्ग आहे. जो अनेक आर्थिक उपक्रमांना जन्म देतो आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. आता संपूर्ण सरकारी दृष्टीकोनातून, सरकारच्या सामुहिक शक्तीचा वापर योजना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. यामुळे अनेक दशकं अपूर्ण असलेले प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन लॉंच करताना सांगितलं. पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन केवळ सरकारी प्रक्रिया आणि त्यात सहभागी असलेल्या विविध भागधारकांना एकत्र आणत नाही तर हे दळणवळणाच्या विविध पध्दतींना जोडण्यास मदत करते. हा समग्र कारभाराचा विस्तार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतातील पहिली आंतरराज्यीय नैसर्गिक वायू पाइपलाइन (Natural Gas Pipeline) 1987 मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर 2014 पर्यंत म्हणजेच 27 वर्षात देशात 15,000 किमीची नैसर्गिक वायूची पाइपलाइन निर्माण केली गेली. आज देशभरात 16,000 किमी पेक्षा जास्त कामे नैसर्गिक वायू पाइपलाइनवर सुरु आहेत. हे काम येत्या 5-6 वर्षात पुर्ण करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 2014 पूर्वीच्या 5 वर्षात फक्त 1900 किमी लोहमार्गाचे (Railway Lines) दुपदरीकरण झाले होते. गेल्या 7 वर्षात आम्ही 9 हजार किलोमीटरपेक्षा जास्त लोहमार्गाचे दुपदरीकरण केलं आहे. 2014 पूर्वीच्या 5 वर्षात केवळ 3 हजार किलोमीटर लोहमार्गाचं विद्युतीकरण झालं होतं. गेल्या 7 वर्षात आम्ही 24 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लोहमार्गाचं विद्युतीकरण केलं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. 2014 पूर्वी सुमारे 250 किलोमीटर ट्रॅकवर मेट्रो (Metro) धावत होती. आज 700 किलोमीटरपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे आणि 1 हजार किलोमीटर नव्या मेट्रो मार्गांचं काम सुरू आहे. 2014 पूर्वीच्या 5 वर्षात 60 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरनं जोडल्या गेल्या होत्या. मात्र गेल्या 7 वर्षात आम्ही दिड लाखांपेक्षा अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरनं जोडल्या आहेत, असं मोदी म्हणाले. देशातील शेतकरी आणि मच्छिमारांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रक्रियेशी (Process) निगडीत पायाभूत सुविधांचा वेगानं विस्तार केला जात आहे. 2014 मध्ये देशात केवळ 2 मेगा फूडपार्क (Mega Food Park) होते. आज देशात 19 मेगा फूडपार्क कार्यरत आहेत. आता हीच संख्या 40 वर नेण्याचं आमचं उदिदष्ट आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
  First published: