जाहिरात
मराठी बातम्या / देश / गडकरींची रेकॉर्ड तोड कारवाई; Road Accidentनंतर पीडित व्यक्तीची तक्रार, अवघ्या 2 तासात रस्ते दुरुस्ती

गडकरींची रेकॉर्ड तोड कारवाई; Road Accidentनंतर पीडित व्यक्तीची तक्रार, अवघ्या 2 तासात रस्ते दुरुस्ती

गडकरींची रेकॉर्ड तोड कारवाई; Road Accidentनंतर पीडित व्यक्तीची तक्रार, अवघ्या 2 तासात रस्ते दुरुस्ती

नितीन गडकरींना अनेकदा काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी सर्वांसमोर कानही टोचले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

छिंदवाड़ा, 13 ऑक्टोबर :  रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते..पावसाळ्यात असं चित्र अनेकदा पाहायला मिळतं. राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती आणि हायवेवरील चांगल्या रस्त्यांसाठी प्रयत्न केले आहेत. अनेकदा काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी सर्वांसमोर कानही टोचले आहे. ही घटना नॅशनल हायवेची आहे. खड्ड्यामुळे एका कारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यानंतर पीडित व्यक्तीने रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (NITIN GADKARI) यांच्याकडे तक्रार केली. मंत्र्यांनी अवघ्या दोन तासात रस्त्याची डागडुजी केली आणि जबाबदार कंपनीवर कारवाईदेखील केली. (Gadkaris record break action Complaint of victim after road accident repair of roads in just 2 hours) केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी ( union minister nitin gadkari ) यांनी एनएच-47 येथील रस्ते अपघातील पीडितेच्या तक्रारीनंतर रस्ते उभारणी करणाऱ्या कंपनीविरोधात NHAI च्या डायरेक्टरला कारवाईचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर रस्ते निर्मिती करणाऱी कंपनी ओरिएंटल स्ट्रक्चर इंजीनियरिंगच्या विरोधात पांढ़र्ना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी वकिलाच्या कारचा झाला होता अपघात बैतूलमधील आमला येथे राहणारे वकील राजेंद्र उपाध्याय आपल्या आईवर उपचार केल्यानंतर नागपूरहून आपल्या घरी जात होते. त्यादरम्यान हिरवा गावाजवळील रस्ते खराब असल्याकारणाने त्यांची कार पलटली. या अपघातात ते आणि त्यांची आई जखमी झाले. या प्रकरणात त्यांनी जवळील पोलीस ठाण्यात तक्रार केली. हे ही वाचा- ‘ते कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते’,वीर सावरकरांबाबत मोहन भागवतांची प्रतिक्रिया कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात FIR एनएच-47 रस्त्याची हालत खराब असल्या कारणाने याच्या दुरुस्तीचं काम ओरिएंटल स्ट्रक्चर इंजीनियरिंग कंपनी करीत आहे. त्यांनी रस्त्याचे खड्डे खोदले आहेत. मात्र वाहन चालकांना सावध करण्यासाठी कोणताही बोर्ड लावलेला नाही. याकारणामुळे वकिलासह आणि दोन कारचा या ठिकाणी अपघात झाला. या प्रकरणात पीडित व्यक्तीने रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीला आरोपी ठरवित गुन्हा दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात