जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅन

कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅन

कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅन

एकीकडे कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरातीय सर्व देश करत असताना दुसरीकडे वेगवेगळ्या औषधांचाही वापर केला जात आहे. आता भारत कोरोनाला हरवण्यासाठी एक नवा फॉर्म्युला वापरत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मे : देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरातीय सर्व देश करत असताना दुसरीकडे वेगवेगळ्या औषधांचाही वापर केला जात आहे. आता भारत कोरोनाला हरवण्यासाठी एक नवा फॉर्म्युला वापरत आहे. नामांकित फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क यांनी असा दावा केला आहे की भारतीय नियामक मंडळाचे महासंचालक डीसीजीआय यांनी नवीन उपचार आणि औषधांसाठी आवश्यक मान्यता दिली आहे. क्लिनिकल चाचणीसोबत पुढे जाण्यासाठी आता दोन 2 अँटी-व्हायरल औषधांचे मिश्रण भारतात वापरले जाणार आहे. याच फॅव्हिपायरवीर आणि अम्फिनोव्हिर यांचे मिश्रण समाविष्ट केले जाईल. ही क्लिनिकल चाचणी देशभरातील रूग्णालयात दाखल झालेल्या कोव्हिड-19 रुग्णांवर केली जाईल आणि या उपचारादरम्यान सुरक्षा आणि प्रभाविपणा यांचे मूल्यांकन केलं जाईल. याआधी चीन, हॉंगकॉंग आणि बांगलादेशमध्ये औषधांचे मिश्रण वापरून कोरोना रुग्ण बरे केले होते. वाचा- इंडिगो-एअर इंडिया विमानातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह, शेकडो प्रवासी क्वारंटाइन असा असेल प्लॅन यासाठी भारतातील कोव्हिड रूग्ण दोन गटात विभागले जातील, ज्यामध्ये एका गटाला दोन अँटी-व्हायरल औषध तयार केलेल्या औषधाचे मिश्रण दिले जाईल, तर दुसर्‍या गटाला फक्त फॅव्हीपिरवीर दिलं जाईल. वाचा- लॉकडाउन सुरू झाल्यापासून किती लोकं क्वारंटाइन? राज्य सरकारने जाहीर केली आकडेवारी ट्रायलबाबत कंपनीनं दिली माहिती इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार ग्लेनमार्क कंपनीनं असे नमूद केलं आहे की, की फॅव्हीपिरवीर आणि युमिफेनोव्हिर वेगवेगळे काम करतात, म्हणून दोन अँटी-व्हायरल औषधांचे मिश्रण केल्यास त्याचे परिणाम चांगले येतील असा प्राथमिक अंदाज आहे. या ट्रायलला FAITH (FA vipiravir plus Um I fenovir Trial) असे नाव दिलं आहे. वाचा- WHO ने ट्रायल थांबवलं तरी भारतात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा का होतोय वापर? कोणती आहेत ही 2 औषधं फॅव्हीपिरवीर हे एक ओरल अँटीवायरल औषध आहे. 2014मध्ये जपानमध्ये उद्भभवलेल्या इन्फ्लूएन्झा व्हायरस संसर्गाच्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं. हे अँटी-व्हायरल औषध व्हायरल प्रतिकृती प्रतिबंधित करते. तर युमिफेनोव्हिर हे आणखी एक ओरल अँटीव्हायरल औषध आहे जी पेशींना व्हायरसच्या संपर्कात येण्यास प्रतिबंधित करते आणि व्हायरल एंट्री इनहिबिटर म्हणून कार्य करते. लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं अंगावर काटा डॉक्टरांचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी अशा कोरोना वॉरियर्सना सलाम केलं आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात