नवी दिल्ली, 5 एप्रिल : भारतीय हवाई दल लवकरच S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची चाचणी करणार आहे. ही मिसाईल सिस्टिम रशियाकडून विकत घेण्यात आली आहे. भारताकडे आलेल्या मिसाईल प्रणालीची रशियाने पाठवण्यापूर्वी चाचणी केली होती. मात्र भारतात आल्यानंतर त्यांची चाचणी झालेली नाही. उच्चपदस्थ सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी लवकरच होईल, या मिसाईल सिस्टिमद्वारे कोणत्याही वेगवान टार्गेटला लक्ष्य केलं जाईल. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. या मिसाईल सिस्टिमचे पहिले दोन स्क्वॉड्रन उत्तर आणि पूर्वेकडील सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. हवाईदलाला आतापर्यंत तीन स्क्वॉड्रन मिळाले आहेत. यासोबतच सिम्युलेटरही मिळाले आहेत. ही एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्यासाठी भारताने रशियाशी 35 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. S-400 मिसाईल सिस्टिमच्या एका रेजिमेंटमध्ये आठ लाँचर असतात. प्रत्येक ट्रकमध्ये चार लाँचर असतात. त्यातून चार मिसाईल्स प्रक्षेपित होतात. एका रेजिमेंटमध्ये एकूण 32 मिसाईल्स असतात. भारताजवळ असे तीन रेजिमेंट आहेत. यामुळे राजधानी दिल्लीसह सीमाभागातील सुरक्षा मजबूत होईल.
अमेरिकेने भारताच्या वापराबद्दल केलेला दावा या मिसाईल सिस्टिमबाबत गेल्या वर्षी अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने म्हटलं होतं की, जर चीन-पाकिस्तानने कोणतीही अॅक्शन घेतली तर भारत त्यांच्याविरोधात S-400 मिसाईल सिस्टिम वापरू शकतो. यूएस डिफेन्स इंटिलिजेन्स एजन्सीचे डायरेक्टर लेफ्टनंट जनरल स्कॉट ब्रियर म्हणाले होते की, डिसेंबर 2021 पासून रशियाने भारताला S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम देण्यास सुरुवात केली होती. स्कॉट यांनी सांगितले की, भारताने जून 2022 पासून पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर या मिसाईल्स तैनात करण्यास सुरुवात केली आहे. सीमेबाबत चीनसोबत सतत संघर्ष सुरू आहे, पाकिस्तानही शांत बसत नाहीये, अशातच ही सिस्टिम संरक्षणाच्या दृष्टिने उपयोगी पडणार आहे. या मिसाईल सिस्टिमच्या क्षमतेबद्दल जाणून घेऊयात. हेही वाचा - धक्कादायक; नवजात बाळाला तोंडात धरून भटकं कुत्रं फिरत होतं, रुग्णालयात बाळाचा मृत्यू S-400 मिसाईल सिस्टिमचे पूर्ण नाव काय S-400 मिसाईल सिस्टिमचे पूर्ण नाव एस-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम आहे. ही हवेतून निशाणा साधून हल्ला करणाऱ्या मिसाईल्सना नष्ट करते. या सिस्टिमपुढे कोणतंही शस्त्र टिकू शकत नाही. ही जगातील सर्वांत शक्तीशाली एअर डिफेन्स प्रणाली आहे. आशियामध्ये शक्तिसंतुलित ठेवण्यासाठी अशा मिसाईलची गरज होती, ती आता पूर्ण झाली आहे. चीन असो वा पाकिस्तान त्यांनी हल्ला केल्यास S-400 मिसाईल एअर डिफेन्स सिस्टिमच्या बळावर भारत न्यूक्लियर मिसाईल्सना देशात येण्यापूर्वी हवेतच नष्ट करेल. S-400 मिसाईल सिस्टिमच्या रडारवरून भारत चीन-पाकिस्तान सीमेवरही लक्ष ठेवू शकेल. युद्ध झाल्यास भारत S-400 सिस्टिमने शत्रूची लढाऊ विमानं उड्डाण करण्यापूर्वीच त्यांना नष्ट करू शकते. चीनचे जे-20 फायटर प्लेन किंवा पाकिस्तानच्या अमेरिकन एफ-16 लढाऊ विमानांचा निभावही या पुढे लागणार नाही. S-400 ला नाटो द्वारे SA-21 Growler लाँग रेंज डिफेन्स मिसाईल सिस्टिमही म्हटलं जातं. उणे 50 डिग्री ते उणे 70 डिग्री तापमानात काम करण्यास सक्षम या मिसाईलला नष्ट करणं शत्रूंसाठी खूप अवघड आहे, कारण तिची विशिष्ट पोझिशन नसल्याने डिटेक्ट करणं कठीण आहे. S-400 सिस्टिममध्ये किती रेंजची मिसाईल्स असतात? S-400 मध्ये 40, 100, 200 व 400 किलोमीटर रेंजची म्हणजे इतक्या अंतरावरील लक्ष्याचा भेद करू शकणारी चार मिसाईल्स असतात. ती सिस्टिम 100 ते 40 हजार फुटांवर उडणाऱ्या टार्गेटला ओळखून नष्ट करू शकते. तिचं रडार खूप स्ट्राँग आहे. ती 600 किलोमीटरच्या रेंजमध्ये जवळपास 160 टारगेट ट्रॅक करू शकते. 400 किलोमीटर पर्यंत 72 टारगेट ट्रॅक करू शकते. ही सिस्टिम मिसाईल एयरक्राफ्ट किंवा ड्रोनने झालेल्या हवाई हल्ल्यांनाही प्रत्युत्तर देऊ शकते. एस-400 मिसाईल सिस्टिमचा इतिहास शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि अमेरिकेत शस्त्रे बनवण्याची स्पर्धा लागली होती. रशियाला अमेरिकेसारखी मिसाईल्स बनवता न आल्याने त्यांनी अशा यंत्रणेवर काम सुरू केलं, जी ही मिसाईल्स लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करतील. 1967 मध्ये रशियाने S-200 प्रणाली विकसित केली. एस सीरिजमधील ही पहिली मिसाईल होती. S-300 ची निर्मिती 1978 मध्ये झाली. S-400 हे 1990 मध्येच विकसित करण्यात आलं होतं. त्याची चाचणी 1999 मध्ये सुरू झाली. यानंतर, 28 एप्रिल 2007 रोजी रशियाने पहिली S-400 क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली होती. हेही वाचा - तोंडाला चिखल, माश्यांची शिकार; वाघाला अशा अवस्थेत पाहून नेटकऱ्यांना आली कीव, Video व्हायरल पाकिस्तानजवळ अशी मिसाईल सिस्टिम आहे का? पाकिस्ताजवळ HQ-9 एअर डिफेन्स प्रणाली आहे पण ही S-400च्या तुलनेत जास्त ताकदीची नाही. पाकिस्तानी एअर डिफेन्स प्रणालीची कमाल रेंज 300 किलोमीटर आहे, तर, एस-400 ची 400 पेक्षा जास्त आहे. HQ-9 ची गती 4900 किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त आहे, पण एस-400 च्या चारही व्हेरियंट्सची गती वेगळी आहे. ही 3185 किलोमीटर ते 17,287 किलोमीटर प्रतितासादरम्यान आहे. पाकिस्तानच्या HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम मिसाईल्सची कमाल उड्डाण सीमा 12 किलोमीटर, 41 किमी आणि 50 किमी आहे. तर, भारतीय S-400 एअर डिफेन्स मिसाइल्स 20, 30 आणि 60 किमी उंचीवर जाऊन शत्रूंची मिसाईल्स नष्ट करू शकतात.

)







