नवी दिल्ली, 5 एप्रिल : वाघ हा जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे. वाघाला भयंकर शिकारी म्हणून ओळखलं जातं. तो आपल्या शिकारीला क्वचितच सोडत असेल. त्यामुळे जंगलातील इतर प्राणीही त्याला घाबरतात. या मांसाहारी प्राण्यांना जंगलातील प्राण्यांना मारून पोट भरण्याशिवाय जगण्याचे दुसरे साधन नाही. अशात परिस्थितीत ते पोट भरण्यासाठी कशाचीही शिकार करताना दिसून येतात. सध्या वाघाच्या शिकारीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वाघाने माश्याची शिकार केली असं सांगितलं तर तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही. मात्र खरंच एका वाघाने माशाची शिकार केली असून याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर फिरत आहे. व्हिडिओमध्ये एक वाघ चिखलात घुसून माश्याची शिकार करताना दिसत आहे. चिखलात शिरल्यामुळे त्याचे पाय तोंडही चिखलाने माखलेलं पहायला मिळतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पाहणारेही वाघाला असं पाहून थक्क झाले आहेत.
आत्तापर्यंत सगळ्यांनी वाघाची मोठी शिकार करताना पाहिलं असेल. मात्र भेदरलेल्या शिकारीची ही अवस्था पाहून लोकांच्या मनात त्याच्याबद्दल वाईट वाटू लागले आहे. सगळ्यात मोठ्या प्राण्याला एकाच वेळी फाडून टाकणारा भयंकर शिकारी, शेवटी आपली भूक भागवण्यासाठी तो माशांवर आला आहे. त्यामुळे अनेकांना प्राणी संकटात असल्याचं म्हटलंय.
Big Cats India नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अगदी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचाही वर्षाव होताना दिसतोय.