नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : भारत-पाकिस्तानाचं नातं (India Pakistan Relations) संपूर्ण जगाला माहिती आहे. एकेकाळी एकच राष्ट्र असलेल्या या दोन्ही राष्ट्रांमधून आता विस्तव जात नाही. पाकिस्तान सतत काही ना काही कुरापती काढतच असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानची प्रतिमा फारशी चांगली नाही. या दोन्ही देशांच्या सीमेवर तर सतत हाय अलर्टच असतो.
लष्कर किंवा नौदलाचे जवान अत्यंत सतर्क असतात. त्यात 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तर बंदोबस्त अत्यंत कडक ठेवण्यात येतो. दोन्ही देशांमधले संबंध अत्यंत तणावपूर्ण असल्याने आंतरराष्ट्रीय सीमांचं (International Border) उल्लंघन करून एकमेकांच्या देशांमध्ये कोणी घुसखोरी केली तर तणाव अधिक वाढतो; पण असे तणावपूर्ण संबंध असतानाही पाकिस्तानच्या नौदलाने भारतीय जहाजातील नऊ क्रू मेंबर्सची सुटका (Pakistan Navy Rescues 9 Indian Crew Members ) करून त्यांचे जीव वाचवले आहेत.
हे ही वाचा : McDonald चं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, विमानाच्या तिकिटापेक्षाही जास्त पैसे दंडातच गेले
ग्वादरजवळ अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea Near Gwadar) ही सुटका करण्यात आली. डेली पाकिस्तानच्या वेबसाईटवर याबद्दलचं वृत्त देण्यात आलं आहे. एकमेकांबद्दल या दोन्ही देशांत अजून माणुसकी शिल्लक आहे हेच यावरून दिसून आलं आहे.
पाकिस्तानी नौदलाचे जनसंपर्क विभागाचे महासंचालक यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. तसंच त्यांनी फेसबूकवरही ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पाकिस्तानच्या सागरी माहिती केंद्राला (Pakistan Maritime Information Centre) 9 ऑगस्ट 2022 रोजी एक आपत्कालीन मदतीसाठीचा फोन आला. भारतीय जहाज जमुना सागर हे बुडत असल्याबद्दल हा कॉल होता. या जहाजावर 10 भारतीय क्रू मेंबर होते.
हा फोन आल्यानंतर पाकिस्तानच्या नौदलाच्या वतीने त्याला तातडीनं सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. “MT KRUIBEKE” या व्यापारी जहाजावर मदतीची आवश्यक ती सर्व सामग्री चढवून बुडत असलेल्या भारतीय जहाजातील क्रू मेंबर्सचा जीव वाचवण्यासाठी ते पाकिस्तानी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाठवून दिलं.
हे ही वाचा : काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला तर दिल्लीत घातपात, 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी
या व्यापारी जहाजामुळे भारतीय जहाजावरील 9 क्रू मेंबर्सचा जीव वाचवण्यात यश आलं. त्यानंतर या जहाजानं दुबईच्या दिशेनं पुढचा प्रवास केला आणि दुबईमध्ये या भारतीय क्रू ला उतरवण्यात आलं. इतकंच नाही तर पाकिस्तानी नौदलाचं आणखी एक जहाज आणि दोन हेलिकॉप्टर्सही या घटनास्थळी रवाना करण्यात आली होती. भारतीय जहाजावरील एका क्रू मेंबरचा दुर्दैवाने मृत्यू झाला. जहाज बुडालं त्यावेळेस हा क्रू मेंबर बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह शोधून काढण्यात पाकिस्तानी नौदलाला यश आलं आहे.
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. या पूर्वीही पाकिस्तानी नौदलानं भारतीयांचे प्राण वाचवले आहेत. या पूर्वी ST Mars या बोटीवरील 12 भारतीय मच्छामारांची पाकिस्तानी नौदलानं सुटका केली होती. आपल्या सागरी सीमेचं संरक्षण करण्याबरोबरच अत्यावश्यक बचाव आणि सुटकाकार्यातही पाकिस्तानी नौदलाचे जवान नेहमीच आघाडीवर असतात असंच दिसून आलं. एकूणच खाकी वर्दीच्या आड दोन्ही देशांमधील माणुसकी अजूनही कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, India vs Pakistan, Indian navy, Pakisatan