मराठी बातम्या /बातम्या /विदेश /McDonald चं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, विमानाच्या तिकिटापेक्षाही जास्त पैसे दंडातच गेले

McDonald चं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, विमानाच्या तिकिटापेक्षाही जास्त पैसे दंडातच गेले

McDonald चं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, विमान तिकिटापेक्षा जास्त झाला दंड

McDonald चं पार्सल नेणं प्रवाशाला पडलं महागात, विमान तिकिटापेक्षा जास्त झाला दंड

विमानातून आपल्या आवडीचा पदार्थ अधिकाऱ्यांना माहिती न देता नेणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. मॅकडोनाल्डचं पार्सल घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल 2,664 न्यूझीलंड डॉलर्सचा दंड वसूल केला गेला.

  मुंबई, 08 ऑगस्ट: विमानातून आपल्या आवडीचा पदार्थ अधिकाऱ्यांना माहिती न देता नेणं (Uncleared Food) एका प्रवाशाला  चांगलंच महागात पडलं आहे. मॅकडोनाल्डचं पार्सल घेऊन जाणाऱ्या एका प्रवाशाला ऑस्ट्रेलियाच्या डार्विन एअरपोर्टवर झिंटा (Zinta) नावाच्या डिटेक्टर कुत्र्यानं पकडलं आणि या प्रवाशाकडून तब्बल 2,664 न्यूझीलंड डॉलर्सचा दंड केला गेला. मॅकडोनाल्डच्या (Mac Donald Breakfast) या पॅकेजमध्ये दोन अंडी, बीफ सॉसेज मॅकमफीन्स, हॉट केक्स आणि हॅम असं सगळं होतं. या अन्नातून हात, पाय आणि तोंडाचा आजार पसरत असल्याचा संशय आल्यानं त्याला पकडण्यात आलं. त्याच्याकडून हे पॅक केलेलं अन्न ताब्यात घेण्यात आलं. ते नष्ट होण्यापूर्वी त्यात आजार (FMD) पसरवणारे विषाणू नाहीत ना हे तपासण्यासाठी चाचण्या करण्यात येणार आहेत. या प्रवाशाकडे असलेले पदार्थ हे मॅकडोनाल्डमधील सर्वांत महागडं मिल समजलं जातं. या प्रवाशानं कोणतीही माहिती न देता हे पदार्थ विमानातून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला एअरपोर्टवर त्याला अडवण्यात आलं आणि दंड ठोठावण्यात आला.

  9News च्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया हा देश FMD मुक्त ठेवण्यासाठी कटिबध्द असल्याचं ऑस्ट्रेलियाचे कृषी, मत्स्य आणि वनमंत्री मुर्रे वॅट्स यांनी सांगितलं. हे पदार्थ एखाद्या प्रवाशासाठीचं सगळ्यांत महागडं मक्का मिल ठरल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर याची किंमत बालीच्या विमान प्रवासाच्या भाड्याच्या दुप्पट आहे, असंही या मंत्र्यांनी सांगितलं. “ मात्र जे लोक ऑस्ट्रेलियाच्या अत्यंत कडक बायोसिक्युरिटी नियमांचं (Bio security Rules ) उल्लंघन करतील त्यांच्याबद्दल मला अजिबात सहानुभूती नाही आणि तुम्ही सहज पकडले जाऊ शकता हे आत्ताच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं,” असंही त्यांनी सांगितलं. “ऑस्ट्रेलिया FMD मुक्त आहे आणि आम्हाला ते तसंच ठेवायचं आहे,” असंही त्यांनी सांगितलं. “झिंटाने आमचा देश सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत चांगलं काम करायला सुरुवात केली आहे हे पाहून खूप चांगलं वाटत आहे,”, असंही ते पुढे म्हणाले.

  हेही वाचा: Repo Rate Hike: HDFC बँकेच्या कर्जदारांची चिंता वाढली; सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ

  FMD म्हणजेच हात, पाय आणि तोंडाचा आजार हा खूर असलेल्या प्राण्यांमध्ये वेगानं पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. इंडोनेशिया आणि बालीमधून नुकताच याचा प्रसार झाला आहे. जर हा आजार ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर पोहोचला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढील 10 वर्षांत 80 बिलियन डॉलर्स खर्च करावे लागतील असं म्हटलं जात आहे.

  FMD हा मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमधून पसरतो अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या कृषी, मत्स्य आणि वन्य मंत्रालयानं दिली आहे. माती, हाडं, वाहनं आणि उपकरणं यात या आजाराचे विषाणू सापडतात तसंच फ्रोझन आणि चिल्ड आणि फ्रीजमध्ये कोरडे केलेले मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्येही हे विषाणू सापडतात. त्यामुळे काळजी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलं.

  आपल्या आवडीचे पदार्थ लपून विमानातून नेणं हे आता या प्रवाशाला चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Airport, Food, Rules