मराठी बातम्या /बातम्या /देश /देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; जगातील सर्वाधिक व्यावसायिक महिला वैमानिक भारतात

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; जगातील सर्वाधिक व्यावसायिक महिला वैमानिक भारतात

भारतातील प्रवासी विमानकंपन्यांमध्ये तब्बल 13.9 टक्के महिला वैमानिक आहेत, तर मालवाहतूक विमान कंपन्यामध्ये महिला वैमानिकांचे प्रमाण 8.5 टक्के आहे.

भारतातील प्रवासी विमानकंपन्यांमध्ये तब्बल 13.9 टक्के महिला वैमानिक आहेत, तर मालवाहतूक विमान कंपन्यामध्ये महिला वैमानिकांचे प्रमाण 8.5 टक्के आहे.

भारतातील प्रवासी विमानकंपन्यांमध्ये तब्बल 13.9 टक्के महिला वैमानिक आहेत, तर मालवाहतूक विमान कंपन्यामध्ये महिला वैमानिकांचे प्रमाण 8.5 टक्के आहे.

    नवी दिल्ली, 13 मार्च: आजची स्त्री-पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाही. स्त्रीनं आपल्या कर्तबगारीनं वारंवार हे सिद्ध केलं आहे. पुरुषप्रधान संस्कृती असललेल्या आपल्या देशातील स्त्रियाही आता पुरुषी वर्चस्वाची मानल्या जाणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करत आहेत. हवाई उड्डाणासारख्या क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी जागतिक विक्रम नोंदवला असून, आपल्या कामगिरीनं सगळ्या जगाला आश्चर्यचकीत केलं आहे. जगातील अन्य कोणत्याही देशांच्या तुलनेत भारतात व्यावसायिक महिला वैमानिकांचे (Commercial Women Pilot) प्रमाण सर्वाधिक असल्याचं जागतिक आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. भारताच्या शिरपेचात भारतीय महिला वैमानिकांनी मानाचा तुरा खोवला आहे. भारताच्या नागरी हवाईवाहतूक मंत्रालयानं (Ministry of Civil Aviation) नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात 12.4 टक्के अधिक महिला व्यावसायिक वैमानिक असल्याचं हवाईवाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. भारतानंतर आयर्लंडमध्ये 9.9 टक्के महिला वैमानिक आहेत.

    इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वुमन एअरलाईन पायलटसने (International Society of Women Pilots) जगभरातील महिला वैमानिकांची आकडेवारी जमा केली असून, त्यानुसार, भारतातील प्रवासी विमानकंपन्यांमध्ये तब्बल 13.9 टक्के महिला वैमानिक आहेत, तर मालवाहतूक विमान कंपन्यामध्ये महिला वैमानिकांचे प्रमाण 8.5 टक्के आहे. मोठ्या विमान कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त दरात हवाई उड्डाण सेवा देणाऱ्या विमानकंपन्यांमध्ये महिला वैमानिकांचे प्रमाण कमी आहे.

    जागतिक आकडेवारी बघितली तर आयर्लंडनंतर दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक म्हणजे 9.8 टक्के महिला वैमानिक आहेत. कॅनडामध्ये हे प्रमाण 6.9टक्के असून तो जागतिक यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. जर्मनीतही 6.9 टक्के महिला वैमानिक असून, तो पाचव्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये अनुक्रमे 5.4 आई 4.7 टक्के महिला वैमानिक आहेत.

    हे वाचा - 'सरकार फुकट पगार देण्यासाठी आहे का?' नितीन गडकरींनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

    भारतातील महिला वैमानिकांनी जागतिक पातळीवर अनेक बाबतींमध्ये प्रथम स्थान मिळवलं आहे. यामध्ये सर्व महिला वैमानिक आणि महिला कर्मचारी असलेल्या एअर इंडियाच्या (Air India) सॅन फ्रान्सिस्को ते बेंगळूरू हवाई उड्डाणाचा समावेश आहे. एअर इंडियाच्या या विमान फेरीचं नेतृत्व कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी थनमाई, कॅप्टन आकांक्षा सोनावरे आणि कॅप्टन शिवानी मनहास यांनी केलं. या विमानानं 17 तासात 13 हजार 993 किमी अंतर पार केलं.भारतीय विमान कंपनीनं केलेलं आणि उत्तर ध्रुवावरुन झालेलं हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचं व्यावसायिक उड्डाण होतं. विशेष म्हणजे एअर इंडियामध्ये जगातील सर्वात जास्त महिला कर्मचारी आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Air india, India, Tech news