मराठी बातम्या /बातम्या /देश /'सरकार फुकट पगार देण्यासाठी आहे का?' नितीन गडकरींनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

'सरकार फुकट पगार देण्यासाठी आहे का?' नितीन गडकरींनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. 'सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.

नवी दिल्ली, 12 मार्च : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड मतांसाठी ओळखले जातात. केंद्रीय रस्ते वाहतूकीसह सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाचा कारभारही त्यांच्याकडे आहे. या मंत्रालायाच्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. (Nitin Gadkari blasts on government officials)

'गायी म्हशींचं उदाहरण'

गडकरी यांनी यावेळी गायी आणि म्हशीचं उदाहण देऊन अधिकाऱ्यांना सुनावलं. 'आपण गायी म्हशी घरी पाळतो. त्यांनी चांगलं दूध द्यावं म्हणून भरपूर खुराक देतो. पण खुराक दिल्यानंतरही दूधच मिळत नसेल, तर अशा जनावरांचा काय उपयोग?' असा प्रश्न गडकरी यांनी या कार्यक्रमात विचारला.

सरकारी अधिकाऱ्यांच्या अधिक आवश्यकतेच्या मागणीचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. 'सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का? इतके अधिकारी आणि एवढ्या गुंतवणुकीची गरज काय? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

( वाचा : भाजपाचे मंत्री म्हणतात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचा अवतार आहेत' )

नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावरील नाराजी बोलून दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये NHAI च्या इमारतीच्या उद्धघाटन कार्यक्रमात बोलतानाही त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सुनावलं होतं. UPA-1 च्या कार्यकाळात मंजूर झालेल्या त्या इमारतीचं काम NDA सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण झालं. त्याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली होती. 'काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावायला हवेत' अशी सूचना गडकरी यांनी त्या कार्यक्रमात केली होती.

First published:
top videos

    Tags: Government employees, Money, Nitin gadkari, Salary, State government