Home /News /national /

भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोइमतूरहून रवाना; उद्या पोहोचणार शिर्डीला, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोइमतूरहून रवाना; उद्या पोहोचणार शिर्डीला, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोइमतूर हून रवाना; उद्या पोहोचणार शिर्डीला, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोइमतूर हून रवाना; उद्या पोहोचणार शिर्डीला, काय आहेत याची वैशिष्ट्ये?

भारत गौरव योजनेंतर्गत (Bharat Gaurav Yojana) देशातल्या पहिल्या खाजगी रेल्वेला मंगळवारी (14 जून) कोइमतूर (Coimbatore) येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. काय आहेत या खाजगी ट्रेनची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

नवी दिल्ली, 15 जून : देशातली पहिली खाजगी रेल्वे सेवा (Private Railway Service) सुरू झाली आहे. भारत गौरव योजनेंतर्गत (Bharat Gaurav Yojana) देशातल्या पहिल्या खाजगी रेल्वेला मंगळवारी (14 जून) कोइमतूर (Coimbatore) येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोइमतूरहून मंगळवारी निघाली असून, ती गुरुवारी (16 जून) शिर्डीत (Shirdi) साईनगरला पोहोचेल. या स्पेशल ट्रेनमधून 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी. गुगनेसन यांनी ही माहिती दिली आहे. एएनआय या न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, गुगनेसन यांनी सांगितलं, की रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला (Service Provider) 2 वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या सीट्सचं नूतनीकरण केलं आहे. या ट्रेनच्या महिन्याला किमान तीन फेऱ्या होतील. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 कोच आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिर्डीला पोहोचण्यापूर्वी ट्रेन तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू, येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी या स्टेशन्सवर थांबेल. हेही वाचा - Aaditya Thackeray Ayodhya tour: ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत, "अयोध्या रामराज्याची भूमी राजकारणाची नाही" अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, या ट्रेनचे तिकीट दर भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणार्‍या नियमित रेल्वे तिकीट (Tickets Rate) दरांइतकेच आहेत. तसंच, या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केली जाईल. ट्रेनची देखभाल हाउसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हायडर्स (House Keeping Service Providers) करतील. ते संपूर्ण प्रवासादरम्यान ठराविक वेळेनंतर ट्रेनची साफसफाई करतील. तसंच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाचीही (Veg Food) व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस दलासह एक रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर आणि खासगी सुरक्षा कर्मचारीही या रेल्वेत असतील. रिपोर्टनुसार, या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना स्लीपर नॉन एसीसाठी 2,500 रुपये, थर्ड एसीसाठी 5,000 रुपये, सेकंड एसीसाठी 7,000 रुपये आणि फर्स्ट एसीसाठी 10,000 रुपये तिकिटासाठी मोजावे लागतील. दरम्यान, या रेल्वे सेवेच्या निषेधार्थ दक्षिण रेल्वे मजदूर युनियनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गटाने शहरातल्या रेल्वे स्थानकावर निदर्शनं केल्याचंही कळतंय. दक्षिणेतल्या राज्यांना (South States) शिर्डीशी जोडणारी ही स्पेशल ट्रेन आहे. या सेवेमुळे तमिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकमधल्या (Karnataka) भाविकांना शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी थेट पोहोचता येईल. शिवाय ही पहिलीच खासगी ट्रेन (Private Train) असल्याने या ट्रेनने प्रवास केल्यानंतर प्रवाशांचे अनुभव आणि भावना काय आहेत, ते येत्या काळात कळेलच.
First published:

Tags: India, Indian railway, Shirdi, Train

पुढील बातम्या