Home /News /national /

Aaditya Thackeray Ayodhya tour: ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत, "अयोध्या रामराज्याची भूमी राजकारणाची नाही"

Aaditya Thackeray Ayodhya tour: ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत, "अयोध्या रामराज्याची भूमी राजकारणाची नाही"

Aaditya Thackeray Ayodhya tour: ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत, "अयोध्या रामराज्याची भूमी राजकारणाची नाही"

Aaditya Thackeray Ayodhya tour: ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत, "अयोध्या रामराज्याची भूमी राजकारणाची नाही"

Aaditya Thackeray: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले असून त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे.

अयोध्या, 15 जून : शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर आहेत. थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर पोहोचले. लखनऊ विमानतळावरुन (Lucknow airport) बाहेर येताच आदित्य ठाकरे यांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत (Aaditya Thackeray grand welcome at Airport) करण्यात आलं. यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, हा राजदीय दौरा नाहीये तर श्रद्धेचा विषय आहे. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? आज आम्ही अयोध्येत दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. कुठलाही राजकीय विषय नाहीये. तर विषय आस्थेचा आहे. देवळात गेल्यावर मागणं मागण्यापेक्षा मी नेहमी आशीर्वाद घेत असतो. जी काही सेवा करण्याची आपल्याला संधी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद बोलत असतो. यापुढे देशासाठी, समाजासाठी, राज्यासाठी जे काही कार्य घडायचं असेल ते चांगलं होऊ द्या असं मागत असतो. वाचा : आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; हनुमानगढीच्या महंतांनी म्हटलं, "येताय तर भक्त म्हणून या पण..." अयोध्या ही रामराज्याची भूमी आहे राजकारणाची नाहीये. आस्थेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथे येत आहोत. इथे आम्ही फक्त दर्शनासाठी आलो आहोत. इथे न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर निर्माणाला सुरुवात झाली आहे. मी कुठल्याही राजकारणात, आरोप-प्रत्यारोपात पडू इच्छित नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. वाचा : 'पुतण्याचं अयोध्येत स्वागत, पण काका राज ठाकरेंना नो एंट्रीच' बृजभूषण सिंह स्पष्टच बोलले आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात लखनऊ विमानतळावर त्यांच्या आगमनाने झाली आहे. लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. लखनऊ विमानतळावरून आदित्य ठाकरे कारने अयोध्येकडे निघाले आहेत. वाटेत इस्काँन मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पंचशिल हाँटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन हनुमान गढीला दर्शनासाठी जाणार आहेत. राम भक्तं हनुमानाचे दर्शन झाल्यावर आदित्य ठाकरे प्रभू श्री राम जन्मं भूमीवर रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर लक्ष्मण किला आणि सर्वात शेवटी शरयू नदीवरील नया घाटावर महाआरती आदित्य ठाकरे करणार आहेत. शरयू नदीवरील महाआरतीसाठी शिवसेनेनं मोठी तयारी केल्याचं दिसून येतंय. अयोध्या दौरा संपल्यावर रात्री उशीरा आदित्य ठाकरे मुंबईकडे रवाना होतील.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aaditya thackeray, Ayodhya, Shiv sena

पुढील बातम्या