मोदी सरकारसाठी ही निवडणूक का आहे सर्वात आव्हानात्मक?

मोदी सरकारसाठी ही निवडणूक का आहे सर्वात आव्हानात्मक?

केवळ मोदी व शहा यांच्या नावावरुनच भाजपचा दिल्लीतील 21 वर्षांचा वनवास संपेल का? हा प्रश्नच आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी : गेल्या दोन दशकांपासून भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही. 2020 ची निवडणूकही त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आप पक्ष अधिक निश्चयी दिसत आहे. गेल्या पाच वर्षात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कामाच्या जोरावर जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष भाजप हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाच्या जोरावर निवडणूक लढत आहे. दिल्लीकरांच्या केंद्राच्या निर्णयावर विश्वास आहे. केवळ मोदी व शहा यांच्या नावावरुनच भाजपचा 21 वर्षांचा वनवास संपेल का? हा प्रश्नच आहे. तसं पाहता निवडणुकांचे समीकरण कधी बदलतील हे सांगता येत नाही.

भारतीय जनता पक्षाकडे कोणतंही स्थानिक नेतृत्व नाही. यापूर्वी दिल्लीत कोणी एका काळात मदनलाल खुराना होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दिल्लीत भाजपचे नेतृत्व दिसून येत नाही.

माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल हे दिल्लीतील मोठे स्थानिक नेते आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत ते फार सक्रिय नसल्याने भाजपला गोयल यांच्या प्रसिद्धीचा फार फायदा होईल, असे वाटत नाही.

अकाली दलाबरोबर भाजपची 21 वर्षे जुनी युती तुटली आहे. याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. नागरिकत्व संशोधन कायदा व NRC वर विरोध सुरू असताना भाजपला आतापर्यंत दिल्लीत मिळणारी मुस्लीम मते कितपत मिळतील, यात साशंकता आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधातील प्रदर्शनात शीखांचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक भाजपसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. CSDS ने केलेल्य़ा सर्वेक्षणानुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 7 टक्के मुस्लीम मते मिळाली होती.

अन्य बातम्या...

...आणि या घटनेने मुस्लीम आणि काश्मिरी पंडित आले एकत्र

सावधान! फुटपाथवर विकणाऱ्या चहा-कॉफीमध्ये मिसळला जातोय गांजा

 

First published: January 22, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या