...आणि या घटनेने मुस्लीम आणि काश्मिरी पंडित आले एकत्र

...आणि या घटनेने मुस्लीम आणि काश्मिरी पंडित आले एकत्र

जाती-धर्म या माणसाने तयार केल्या आहेत, मात्र माणूसकी ही सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे

  • Share this:

बंदिपोरा, 22 जानेवारी : जम्मू-काश्मिर हा प्रदेश कायम संघर्ष, युद्ध, हल्ले यासारख्या गोष्टींमुळे अधिक चर्चिला जात असला तरी या एका घटनेने जम्मू-काश्मिरमधील भावनिकतेला साद घातली आहे. नागरिकत्व संशोधन कायद्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. राजकीय नेतेही जाती भेदाचे विष वाढविण्यासाठी तीव्र विधानं करीत आहे. यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडत असताना जम्मू-काश्मिरच्या बंदीपोरा या भागात एक वेगळाच व मानवतावादी धडा शिकवला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच काश्मिरी पंडित ज्याला काळा दिवस मानतात अशा त्या दिवसाला 30 वर्षे पूर्ण झाली. 1999 मधील त्या दिवसापासून जम्मू-काश्मिरमध्ये काश्मिरी पंडित विरुद्ध काश्मिरातील मुस्लीम असं वातावरण तयार झालं होतं. काश्मिरी पंडिताच्या मनात मातृभूमी सोडून जावी लागली याचा अत्यंत राग आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या भागात राहणारी काश्मिरी पंडिता जे. किशोरी आजारी होती. तिच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी  तिच्या सोबत ना तिचे काश्मिरी पंडित नातेवाईक होते, ना कोणताही हिंदू. शेवटच्या क्षणी पाणी पाजण्यासाठी तिच्या भागातले मुस्लीम बांधव होते. ते फक्त तिच्या सोबत नव्हे तर त्या मुस्लिमांनी हिंदू पद्धतीने किशोरीचा अत्यंविधीही केला. यालाच तर माणूसकी म्हणतात. किशोरीच्या अत्यंविधीसाठी बंदिपोरा भागातील मुस्लिम बांधव व भगिनी एकत्र आले.

काय आहे काश्मिरी पंडितांचा वाद

काश्मिरच्या खोऱ्यात वास्तव्यास असलेले काश्मिरी पंडित 19 जानेवारी हा काळा दिवस मानतात. याच दिवशी 1990 साली काश्मिर खोऱ्यातील वातावरण अत्यंत बिघडले होते. तेव्हा परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, हजारो काश्मिरी पंडितांनी आपल्याच घरातून पलायन केले. मे 1990 पर्यंत तब्बल पाच लाख काश्मिरी पंडित जीव वाचवण्यासाठी आपली मातृभूमी सोडून काश्मिरच्या बाहेर निघून गेले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे पलायन मानले जाते. त्यामुळे दरवर्षी 19 जानेवारी रोजी हा दिवस काश्मिरी पंडित काळा दिवस मानतात. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर काश्मिरी पंडितांचे संदेश ट्रेंड झाले होते. देशातील विविध भागांमध्ये राहणारे काश्मिरी पंडितांनी हम वापस आएंगे चा संदेश दिला.

अन्य बातम्या

आर्थिक राजधानी आहे रानटी जनावरांचं शहर, तुम्ही कल्पनाही नाही करणार अशी मुंबईची '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kashmir
First Published: Jan 22, 2020 01:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading