नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: कोराना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून (Corona virus 2nd wave) भारत देश अजूनही पूर्णपणे सावरला नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचा (Corona cases in India) आकडा वाढताना दिसत आहे. अशात तज्ज्ञांकडून कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत देशाची झालेली अवस्था पाहता देशाची चिंता वाढत आहे. असं असलं तर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मात्र भारतानं मोठा टप्पा गाठला आहे. भारतानं लसीकरणाच्या बाबतीत 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. (India crosses 50 crore mark in vaccination) देशात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत, याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी भारतात एकूण 43.29 लाख लशीचे डोस देण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्यानंतर, PM नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा- अदार पूनावालांची मोठी घोषणा, Covishield घेतलेल्या विद्यार्थ्यांना सीरमकडून गिफ्ट पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘भारतानं आज कोविड -19 विरूद्धच्या लढाईत एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. आज भारतानं लसीकरणात 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा आकडा भविष्यात असाच वाढत जाईल. सर्व नागरिकांना #सर्वांनामोफतलस मोहीमेंतर्गत लस मिळत असल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे.
India’s fight against COVID-19 receives a strong impetus. Vaccination numbers cross the 50 crore mark. We hope to build on these numbers and ensure our citizens are vaccinated under #SabkoVaccineMuftVaccine movement.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
हेही वाचा- GOOD NEWS! महाराष्ट्रातील हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देखील एक ट्वीट केलं होतं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे, देशाने लसीकरणात 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.’ लसीकरणातील गतीचा उल्लेख करताना मांडवीय म्हणाले की, लसीकरणात 10 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी देशाला 85 दिवस लागले होते. त्यानंतर पुढील 45 दिवसांत 20 कोटींचा आकडा पार केला होता. तर पुढच्या 29 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार केला. त्यानंतर अवघ्या 24 दिवसांत 40 कोटी आणि पुढील 20 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.’

)







