Home /News /maharashtra /

GOOD NEWS! महाराष्ट्रातील हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

GOOD NEWS! महाराष्ट्रातील हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; एकही सक्रिय रुग्ण नाही

भंडारा जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

Corona in Maharashtra: देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मागील दीड वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे.

    भंडारा, 07 ऑगस्ट: कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मागील दीड वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्यातील भंडारा (Bhandara) हा जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा (Corona-free district) झाला आहे. शुक्रवारी शेवटच्या कोरोना रुग्णाला देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय शुक्रवारी झालेली कोरोना चाचणीत कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला नाही. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितलं की, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्याला कोरोनामुक्त करणं शक्य झालं आहे. याशिवाय त्यांनी ट्रेसिंग, चाचण्या आणि उपचाराबाबत आखलेल्या रणनीतीचाही उल्लेख केला आहे. खरंतर, गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गराडा बुद्रुक गावात कोविडचा पहिला रुग्ण आढळला होता. यावर्षी 12 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात एकाच दिवसात सर्वाधिक 1596 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात सक्रिय प्रकरणांची संख्या सर्वाधिक 12 हजार 847 इतकी होती. त्याचबरोबर जिल्ह्यात 12 जुलै 2020 रोजी पहिल्यांदा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. हेही वाचा-लवकरच मिळू शकेल सिंगल डोस व्हॅक्सिन, Johnson & Johnson ने मागितली परवानगी यावर्षी 18 एप्रिल रोजी सर्वाधिक 12 हजार 847 सक्रिय रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. 22 एप्रिल रोजी 1568 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. जिल्ह्यात 19 एप्रिल रोजी रिकव्हरी रेट 62.58 टक्क्यांवर होता, आता हाच आकडा वाढून 98.11 टक्के इतका झाला आहे. तर 12 एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर 55.73 टक्के होता, आता हा दर शून्य झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात 1.89 टक्के इतका मृत्यूदर आहे. हेही वाचा-कोरोनामुक्त रुग्णाला नीट चालता-बोलता येईना; मेंदूत जे सापडलं ते पाहून डॉक्टर शॉक आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 4 लाख 49 हजार 832 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 59 हजार 809 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग आढळला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 58 हजार 776 जणांनी कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कदम यांनी सांगितलं की, 'जिल्ह्यातील 9.5 लाख एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर यातील 15 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Corona updates, Maharashtra

    पुढील बातम्या