नवी दिल्ली, 09 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) इतकी दहशत निर्माण केली आहे की, एकिकडे रुग्णालयातून कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण पळाला आहे तर दुसरीकडे व्हायरसच्या भीतीनं खासदारांनी स्वत:लाच घरात कोंडून घेतलं आहे. पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातल्या मंगळुरूतील (Mangaluru) एका रुग्णालयातून कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण गायब झाला आहे. या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे रुग्णालयात त्याला वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं होतं. हा संशयित रुग्ण रुग्णालयातून पळून गेला आहे.
Man under observation for coronvirus symptoms goes missing from hospital in Mangaluru: Officials
— Press Trust of India (@PTI_News) March 9, 2020
तर दुसरीकडे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीनं अमेरिकेत (America) दोन खासदारांनी स्वत:ला घरात बंद करून घेतलं आहे. संबंधित - सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’ रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, टेड क्रुझ (Ted Cruz) आणि पॉल गोसर (Paul Gosar) अशी या खासदारांची नावं आहेत.26 फेब्रुवारीला हे दोन्ही खासदार एका कन्झर्व्हेशन पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्समध्ये गेले होते. त्यावेळी एका कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या ते संपर्कात आले होते. ज्या व्यक्तीला आपण आजारी नसल्याचं वाटत होतं, मात्र त्यानंतर तिला कोरोनाव्हायरसचं निदान झालं. आपण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलो होतो, हे समजताच या दोन्ही खासदारांनी स्वत:ला आपापल्या घरात बंद (self quarantines) करून घेतलं. दोन्ही खासदारांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. मात्र आपल्यामुळे व्हायरस पसरू नये, यासाठी खबरदारी म्हणून त्यांनी self quarantines केलं. शिवाय दोघांनीही आपली कार्यालयंही बंद ठेवलीत. 14 दिवसांनंतर ते घराबाहेर पडणार आणि त्यानंतरही स्वत:ची कोरोनाची चाचणी करून घेणार आहेत. संबंधित - धक्कादायक! कोट्यवधी लोकांच्या जीवावर उठणार कोरोना, लाखो भारतीयांचा होणार मृत्यू भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 43 रुग्ण आढळून आलेत. जगभरात कोरोनाव्हायरसचे 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर 3 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. AFP च्या रिपोर्टनुसार, सोमवारी कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 1,10,000 झाली आहे, तर मृतांचा आकडा 3,800 पेक्षा जास्त आहे. 100 देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे.