कोरोनाचा धोका वाढला! देशात 24 तासांत 4000 नवे रुग्ण, रुग्णसंख्या 90 हजारांवर पोहोचली

कोरोनाचा धोका वाढला! देशात 24 तासांत 4000 नवे रुग्ण, रुग्णसंख्या 90 हजारांवर पोहोचली

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. शनिवारी 24 तासांत 4000 नवे रुग्ण आढळून आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे: देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. शनिवारी 24 तासांत 4000 नवे रुग्ण आढळून आले. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90648 वर पोहोचली आहे. देशात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शनिवारी 2752 झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

हेही वाचा...पुण्यात कोरोनाच्या धास्तीने 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रिपोर्ट आला निगेटिव्ह

दुसरीकडे, कोरोनाच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 47 लाखांच्या वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 18 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53035 असून, 30252 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाने गाठला 30 हजाराचा टप्पा

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे. आज 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 41, पुण्यात 7, ठाणे शहरात 7, औरंगाबाद शहरात 5, जळगावमध्ये 3, मीरा भाईंदरमध्ये 2, नाशिक शहरात 1 तर सोलापूर शहरामध्ये 1 मृत्यू झाला आहे.

हेही वाचा...तब्येत बिघडल्यानं वाटेतच सगळे सोडून गेले, मुस्लीम मित्रानं दिली शेवटपर्यंत साथ

नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 47 पुरुष तर 20 महिला आहेत. 67 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 38 रुग्ण आहेत तर 25 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 67 रुग्णांपैकी 44 जणांमध्ये (66टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

First published: May 17, 2020, 7:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या